शहरं
Join us  
Trending Stories
1
सणासुदीच्या तोंडावर सोन्या-चांदीचे दर घसरले! तुमच्या शहरात आज एका तोळ्याची किंमत किती?
2
'आता संयम ठेवणार नाही; पाकिस्तानला जगाच्या नकाशावरुन मिटवू...', लष्करप्रमुखांचा पाकला थेट इशारा
3
“मुंबईच्या गरब्यात सेलिब्रिटींवर लाखोंची उधळण, तेच पैसे शेतऱ्यांना दिले असते”: रोहित पाटील
4
तोंडात कुरकुरे अन् निपचित पडलेला मृतदेह; कोर्टातून फरार झालेल्या आरोपीचा चिमुकलीवर अत्याचार
5
मुंबई-पुण्यात घरांच्या विक्रीत १७% घट; 'या' कारणांमुळे ग्राहकांनी फिरवली पाठ; किमती कमी होणार का?
6
‘आयुष्मान भारत’ योजना बंद पडली? नागपूरच्या रुग्णालयांमध्ये उघडकीस आले धक्कादायक वास्तव; रुग्णांना सेवा नाकारल्या
7
Video - "देवाने हे नियम बनवले नाहीत..."; शॉर्ट्स घालून महिलेने मंदिरात प्रवेश केल्याने मोठा गोंधळ
8
VIDEO: 'पॉवर हिटिंग'! ३ वर्षांच्या चिमुरड्याची बॅटिंग पाहून तुम्हीही म्हणाल- What a Shot!
9
मृत्यूचे कुंड : १०० हून अधिक लोकांना गायब करणारी रहस्यमयी विहीर! ४० मीटर लांब, शास्त्रज्ञांनाही उलगडेना...
10
आशिया चषकातील वादानंतर हवाई दल प्रमुखांचा मोठा दावा; भारताने पाकिस्तानची पाच लढाऊ विमाने पाडली 
11
कोजागरी शरद पौर्णिमा २०२५: पंचकाची अशुभ छाया अन् अमंगल काळ, शुभ मुहूर्त कधी? लक्ष्मी लाभेल!
12
"मी आभार मानतो, त्यांनी माझे 1000 रुपये वाचवले...!"; फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंची खिल्ली उडवली, नेमकं काय म्हणाले?
13
Dombivli Crime: मोबाईलचा पासवर्ड बदलला, कुटुंबात राडा! आई, दोन्ही मुले, आजोबामध्ये तुंबळ हाणामारी
14
अमानुष! लेकीशी भांडण... सासरच्यांनी जावयाला विष पाजलं, पळवून पळवून मारलं; झाला मृत्यू
15
२०२७ पर्यंत ५ राशींना साडेसाती, प्रदोषात ‘हे’ करावे; पंचक कायमचे टळेल, शनि शुभ-कल्याण करेल!
16
आंध्र प्रदेशात देवरगट्टू बन्नी उत्सवादरम्यान दोन जणांचा मृत्यू, ९० जण जखमी
17
Video: छातीत झाडल्या तीन गोळ्या, मित्राच्या हत्येचा बनवला व्हिडीओ; पोलिसांची उडाली झोप
18
हव्वा अन् धुव्वा...! महिंद्रा थार फेसलिफ्ट लाँच! हे दोन मुख्य बदल, ग्राहकांची मागणी ऐकली..., दोन नवे रंग...
19
Crime: 'मी तुमच्या मुलीची हत्या केलीये'; मित्रासोबत रुमवर गेली अन् निळ्यामध्ये ड्रममध्ये...; तरुणीची हत्या का केली?
20
Neena Kulkarni: ज्येष्ठ अभिनेत्री नीना कुलकर्णी यांना मानाचे विष्णुदास भावे गौरव पदक जाहीर!

रोहयो कामावर फिरत्या पोलीस ठाण्याचे कामकाज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2019 22:35 IST

मनात जिद्द असली तर अशक्य ते शक्य करता येते. याचा प्रत्यय नुकताच आला. शनिवारीय फिरते पोलीस स्टेशनचे आयोजन देव्हाडा/नरसिंगटोला गावात होते. मात्र तलावाचे रोहयो कामामुळे गावात कुणीही दिसेनासे झाल्याने ठाणेदार विजय पोटे यांनी चक्क रोहयो कामावर फिरते पोलीस स्टेशनचे कामकाज चालविले. नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. तसेच उपयुक्त माहितीचे मार्गदर्शन केले.

लोकमत न्यूज नेटवर्ककरडी (पालोरा) : मनात जिद्द असली तर अशक्य ते शक्य करता येते. याचा प्रत्यय नुकताच आला. शनिवारीय फिरते पोलीस स्टेशनचे आयोजन देव्हाडा/नरसिंगटोला गावात होते. मात्र तलावाचे रोहयो कामामुळे गावात कुणीही दिसेनासे झाल्याने ठाणेदार विजय पोटे यांनी चक्क रोहयो कामावर फिरते पोलीस स्टेशनचे कामकाज चालविले. नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. तसेच उपयुक्त माहितीचे मार्गदर्शन केले.देव्हाडा/नरसिंगटोला येथे आयोजित फिरते पोलीस स्टेशनचे कामकाज जीथे नागरिक आहेत. तिथेच राबविण्याचा निर्णय करडी पोलीस स्टेशनचे ठाणेदार विजय पोटे यांनी घेतले. रोहयो काम सुरु असलेल्या तलावाच्या दिशेने निघाले. पोलीस व गावातील प्रतिष्ठांचा समुह रोहयो कामावर येतांना दिसल्याने अनेकांत काय झाले असावे, अशा शंकाची चर्चा सुरु झाली. मात्र, पोलिसांचा ताफा पोहचताच नागरिकांची गर्दी झाली. नागरिक आपले काम सोडून एकत्र आले. आज फिरते पोलीस स्टेशनचे आयोजन असून आपणा सर्वांना कायदेविषयक माहिती व आपल्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी तसेच विविध उपयुक्त माहिती देण्यासाठी सर्व आलो आहोत. असे ठाणेदार विजय पोटे यांनी सांगताच अनेकांनी सुटकेचा नि:श्वास टाकला अन् दुपारच्या सुट्टीत कामकाजाला सुरुवात झाली.फिरते पोलीस स्टेशन कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी ठाणेदार विजय पोटे होते. प्रमुख अतिथी म्हणून देव्हाडा ग्रामचे उपसरपंच महादेव फुसे, पोलीस पाटील बोंदरे, ग्रामपंचायत सदस्य अरुण शेंडे, दुर्योधन बोंदरे, महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष व पदाधिकारी, रोजगार सेवक विजय बंसोड प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी ठाणेदार पोटे यांनी लोकसभा निवडणुकीत सर्वांनी मतदानाचा हक्क बजवावा, मतदान आपला अधिकारच नाही तर राष्टÑीय कर्तव्य आहे. परंतू सर्वांनी आदर्श आचारसंहितेचे पालन करावे, कुणाची बदनामी होईल की अपमान होईल, असे कृत्य वा संदेश पाठवू नये, असे सांगितले. सायबर गुन्हेगारीवर प्रकाश टाकताना एटीएम बिघडल्याचे तसेच नविन कार्ड बनविण्याचे नावावर येणाऱ्या फोन किंवा संदेशावर विश्वास ठेवून एटीएम व ओटीपी नंबर देऊ नका, असे सांगून संभाव्य आर्थिक फसवणुकीपासून सावध केले. लैगिक अत्याचार, भ्रृण हत्या, हुंडा बळी व भांडण तंटे सामजस्याने सोडवावे. देव्हाडा येथील अवैध दारु विक्रीवर बंदीची मागणी नागरिकांनी लावून धरली.फिरते पोलीस स्टेशनच्या आयोजनासाठी देव्हाडाचे बिट चे हवालदार राकेशसिंग सोलंकी, पालोरा बिटचे हवालदार विजय सलामे, होमगार्ड सैनिक यांनी मोलाचे सहकार्य केले. यावेळी सुमारे १५० तर २५० महिला उपस्थित होत्या.