Bhandara Fire; भंडारा शहरात बंदला संपूर्ण प्रतिसाद; रस्त्यावर तुरळक वर्दळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2021 13:36 IST2021-01-11T13:36:18+5:302021-01-11T13:36:56+5:30
Bhandara Fire भंडारा जिल्हा रुग्णालयात लागलेल्या आगीत दहा चिमुकल्यांचे दारुण बळी गेल्याच्या निषेधार्थ भंडारा जिल्हा भाजपतर्फे सोमवारी पुकारण्यात आलेल्या भंडारा बंदला शहरातील व्यावसायिक प्रतिष्ठानांनी आपला पाठिंबा दर्शवीत प्रतिसाद दिला.

Bhandara Fire; भंडारा शहरात बंदला संपूर्ण प्रतिसाद; रस्त्यावर तुरळक वर्दळ
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा: जिल्हा रुग्णालयात लागलेल्या आगीत दहा चिमुकल्यांचे दारुण बळी गेल्याच्या निषेधार्थ भंडारा जिल्हा भाजपतर्फे सोमवारी पुकारण्यात आलेल्या भंडारा बंदला शहरातील व्यावसायिक प्रतिष्ठानांनी आपला पाठिंबा दर्शवीत प्रतिसाद दिला. रस्त्यावर तुरळक वर्दळ वगळता सर्वत्र सामसूम आहे. बँका, पेट्रोल पंप, औषधांची दुकाने यांना बंदमधून वगळण्यात आले आहे. शहरातील मेन लाईन, राजीव गांधी चौक गांधी चौक, बसस्थानक परिसरात बंद पाळण्यात आला. शहरातील इतर ठिकाणी बंदला प्रतिसाद मिळाला.
भंडारा येथील खासदार सुनिल मेंढे यांनी रविवारी पत्रपरिषद घेऊन बंदची हाक दिली होती. सखोल न्यायालयीन चौकशी आणि दोषींवर निलंबनाची कारवाई अशा दोन मागण्या त्यांनी केल्या आहेत.