शुक्रवारी ५६३ रुग्ण झाले बरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2021 04:34 AM2021-05-15T04:34:23+5:302021-05-15T04:34:23+5:30

भंडारा : दिवसागणिक कोरोनाबाधितांची संख्या कमी होत असल्याचे निदर्शनास येत आहे. ही जिल्ह्यासाठी दिलासादायक बाब असून शुक्रवारी ५६३ रुग्ण ...

On Friday, 563 patients were cured | शुक्रवारी ५६३ रुग्ण झाले बरे

शुक्रवारी ५६३ रुग्ण झाले बरे

Next

भंडारा : दिवसागणिक कोरोनाबाधितांची संख्या कमी होत असल्याचे निदर्शनास येत आहे. ही जिल्ह्यासाठी दिलासादायक बाब असून शुक्रवारी ५६३ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. शुक्रवारी दोन जणांचा मृत्यू झाला असून १०० व्यक्ती पॉझिटिव्ह आढळले आहेत.

जिल्ह्यात आतापर्यंत ५७ हजार ५ व्यक्ती पॉझिटिव्ह आढळल्या असून त्यापैकी ५२ हजार १८२ जणांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. शुक्रवारी दोन रुग्णांचा मृत्यू झाला. यात लाखनी तालुक्यातील एका ४७ वर्षीय पुरुषाचा तर मोहाडी तालुक्यातील एका पुरुष रुग्णाचा मृत्यू झाला. शुक्रवारी १२०० रुग्णांचे स्वॅब नमुने तपासण्यात आले, त्यापैकी १०० व्यक्ती पॉझिटिव्ह आढळल्या. यात भंडारा तालुक्यातील ३७, मोहाडी ५, तुमसर २९, पवनी ४, लाखनी ९, साकोली दहा तर लाखांदूर तालुक्यातील सहा रुग्णांचा समावेश आहे.

बॉक्स

आतापर्यंत १००९ व्यक्तींचा मृत्यू

भंडारा जिल्ह्यात कोरोनामुळे आतापर्यंत १००९ व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. यामध्ये भंडारा तालुक्यातील ४७५, मोहाडी ९२, तुमसर १०८, पवनी १००, लाखनी ८८, साकोली ९८ तर लाखांदूर तालुक्यातील ४८ व्यक्तींचा समावेश आहे. जिल्ह्याचा मृत्युदर १.७७ इतका असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९१.५३ टक्के आहे.

Web Title: On Friday, 563 patients were cured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.