महिलांकरिता मोफत योगशिबिर
By Admin | Updated: May 31, 2014 23:17 IST2014-05-31T23:17:36+5:302014-05-31T23:17:36+5:30
तेजस्विनी बहुउद्देशिय संस्था, लाखनी द्वारा लाखनी येथे राणी लक्ष्मी कन्या विद्यालयाच्या पटांगणावर योग व व्यक्तिमत्त्व विकास शिबिर घेण्यात आले.

महिलांकरिता मोफत योगशिबिर
भंडारा : तेजस्विनी बहुउद्देशिय संस्था, लाखनी द्वारा लाखनी येथे राणी लक्ष्मी कन्या विद्यालयाच्या पटांगणावर योग व व्यक्तिमत्त्व विकास शिबिर घेण्यात आले.
शिबिराचे उद्घाटन डॉ.प्रतिभा राजहंस यांचे हस्ते, प्राचार्य सुनंदा देशपांडे यांच्या अध्यक्षतेखाली तसेच दिनेश पंचबुद्धे, डॉ.मनीषा निंबार्ते, रोजा कापगते, उर्मिला आगासे, सरपंच लाखनी शिवानी काटकर व योग प्रशिक्षक सुनील भाग्यवानी या प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत पार पडले.
गुरुवंदना व ओमकार याने कार्यक्रमाची सुरूवात झाली. डॉ. प्रतिभा राजहंस यांनी मानवी जीवनात योगचे महत्त्व सांगून आहार-विहार आणि व्यायाम हा सुदृढ आरोग्याचा मुलमंच महिलांना दिला.
दिनेश पंचबुद्धे यांनी उन्हाळ्याच्या सुट्या कशा घालवाव्या यांचे मार्गदर्शन केले तसेच इतर पाहण्यांनीसुद्धा योगविषयक मोलाची माहिती महिलांना व विद्यार्थिनींना दिली. योगगुरू सुनील भाग्यवानी व पल्लवी टिचकुले यांनी शिबिरात सहभागी महिलांना योग्य प्रशिक्षण व आसने शिकविली.
योग शिबिराच्या समारोपप्रसंगी रांगोळी प्रशिक्षण देण्यात आले.
योग व रांगोळी प्रशिक्षणाला बहुसंख्य महिलांनी सहभाग घेऊन लाभ घेतला. सदर शिबिरासाठी भारती टिचकुले, मनीषा खेडीकर, नीलकमल टिचकुले, अर्चना टिचकुले, गीता चोले व इतरांनी सहकार्य केले.
(शहर प्रतिनिधी)