शहरं
Join us  
Trending Stories
1
शिरूरमध्ये 'तुतारी'ने वाढवलं अमोल कोल्हेंचं टेन्शन; निवडणूक आयोगाकडे आक्षेप नोंदवणार?
2
INDIA आघाडीचे ४ मुद्दे पडले भारी; भाजपाच्या 'अबकी बार ४०० पार' ला ब्रेक लागणार?
3
Solapur: पाणी देण्याचे वचन न पाळणाऱ्या शरद पवारांना धडा शिकवा! माळशिरसच्या सभेत नरेंद्र मोदींचा घणाघात
4
संरक्षण मंत्री राजनाथ सिंहांची संपत्ती किती? रिव्हॉल्व्हर, बंदूक, 12 किलो चांदी...
5
“कृपया तीन लाख लीडच्या चर्चा नको”; बाळासाहेब थोरातांनी ठाकरेंच्या उमेदवाराला थेट सांगितले
6
२५०० महिलांचे लैंगिक शोषण करणारा खासदार रेवन्ना परदेशात कसा पळाला? कर्नाटकात खळबळ
7
युद्ध शमणार की आणखी तीव्र होणार? हमासचे शिष्टमंडळ प्रतिक्रिया न देताच परतले, पुढे काय?
8
Amit Shah : "केजरीवालांची जेलमध्ये हत्या होऊ शकते"; AAP च्या आरोपांवर काय म्हणाले अमित शाह?
9
भाग्यवान! अवघ्या 210 रुपयांत मिळाली 10 लाखांची कार; शेतकऱ्याचं 'असं' फळफळलं नशीब
10
मुघलांच्या घोड्यांना संताजी, धनाजी दिसायचे तसे मोदींना ठाकरे, पवार दिसतात; राऊतांची टीका
11
'ती' कविता ऐकून थेट उद्धव ठाकरेंचा संकर्षण कऱ्हाडेला फोन, म्हणाले...
12
'देवरा' सिनेमात मराठमोळ्या अभिनेत्रीची वर्णी, ज्युनिअर एनटीआरच्या पत्नीची भूमिका साकारणार
13
नाशिक: राऊड घाटात एसटीचा भीषण अपघात; ६ प्रवाशांचा मृत्यू, टायर फुटून ट्रकला धडकली
14
Amit Shah : "हे लोक कन्फ्यूज, यूपी सोडून पळून गेले"; अमित शाह यांचा राहुल-प्रियंका गांधींवर जोरदार हल्लाबोल
15
Ravindra Waikar तिढा सुटला, उमेदवार ठरला! मुंबई उत्तर-पश्चिममध्ये रविंद्र वायकरच महायुतीचे उमेदवार
16
“भाजपा नेत्यांना मराठ्यांचा द्वेष, म्हणूनच PM मोदींना इतक्या सभा घ्याव्या लागतात”: मनोज जरांगे
17
‘कॉलर उडवताना सकाळ आहे की संध्याकाळ हे पाहावं लागतं’, शरद पवारांची उदयनराजेंवर बोचरी टीका 
18
१३९ दिवस शनी वक्री: ५ राशींना लॉटरी, वरदान काळ; गुंतवणुकीतून लाभ, पदोन्नती, पगारवाढ शक्य!
19
Video - बापमाणूस! घटस्फोटानंतर वडिलांनी वाजत-गाजत लेकीला आणलं आपल्या घरी
20
May Born Astro: मे महिन्यात जन्मलेले लोक म्हणजे चेहऱ्याने लोभस, डोक्याने तापट आणि लहरी स्वभावाचे मिश्रण!

कारवाईत रेतीची अवैध वाहतूक करणारे चार टिप्पर जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2021 5:00 AM

मोहाडी येथे नवीन तहसीलदार दीपक कारंडे रुजू झाल्यापासून महसूल विभाग चांगलाच ‘ॲक्शन मूड’ मधे आला असून, अवैध गौण खनिजावर आळा घालण्यासाठी धाड सत्र सुरू करण्यात आले असल्याचे पहावयास मिळत आहे. दोन दिवसांपूर्वीच अवैध मुरूम काढणाऱ्या पाच वाहनांवर जप्तीची कारवाई करण्यात आली होती, तर आज रविवारी रेतीच्या अवैध चार टिप्परवर कारवाई करून जप्त करण्यात आले. 

लाेकमत न्यूज नेटवर्कमोहाडी : तालुक्यातील निलज रेती घाटावरून अवैध रेती वाहून नेणाऱ्या चार टिप्परवर बोरगाव शिवारात जप्तीची कारवाई नायब तहसीलदार मोरेश्वर हुकरे यांनी रविवारी सकाळी केली. या कारवाईने रेती तस्करांचे धाबे दणाणले आहे. मोहाडी येथे नवीन तहसीलदार दीपक कारंडे रुजू झाल्यापासून महसूल विभाग चांगलाच ‘ॲक्शन मूड’ मधे आला असून, अवैध गौण खनिजावर आळा घालण्यासाठी धाड सत्र सुरू करण्यात आले असल्याचे पहावयास मिळत आहे. दोन दिवसांपूर्वीच अवैध मुरूम काढणाऱ्या पाच वाहनांवर जप्तीची कारवाई करण्यात आली होती, तर आज रविवारी रेतीच्या अवैध चार टिप्परवर कारवाई करून जप्त करण्यात आले. गुप्त माहितीच्या आधारे निलज घाटावरून  अवैध रेती वाहतूक करणारा टिप्पर मालक दीपक मानापुरे रा. नागपूर यांचा टिप्पर (एम.एच. ४०, ए. के. २४३८), राहुल स्वामी (रा. नागपूर) यांचा एम.एच.४०/बी.जी.१२७१, लोकेश जैन (रा. नागपूर) यांचा एम.एच. ४०/ बी.एफ. १५३३ आणि एम.एच. ४०/ बी. एफ. ४१९४ या चार टिप्परवर जप्तीची कारवाई करून पोलीस स्टेशन करडी येथे जमा करून ठेवण्यात आले आहे. तहसील कार्यालयाचे वाहन टिप्परसमोर आडवे येताच दोन टिप्परचालक टिप्पर सोडून फरार झाले. त्यानंतर टिप्परमालकांना बोलावून कारवाई करण्यात आली. ही कारवाई नायब तहसीलदार मोरेश्वर हुकरे, तलाठी पी. व्ही. घोडेस्वार, तलाठी व्ही. ए. कांबळे, कोतवाल चंदन नंदनवार, चालक चंदू बावणे यांच्या चमूने पार पाडली. या कारवाईमुळे इतर घाटावर सुरू असलेली रेती चोरीच्या वाहनांची पळापळ सुरू झाली होती, अशी चर्चा आहे.

 

टॅग्स :sandवाळूTahasildarतहसीलदार