शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
2
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
3
'भाजपचे सरकार कायम राहणार नाही, आज ना उद्या नक्की बदला घेईन', ममता बॅनर्जींचा इशारा
4
हैदराबादमध्ये पावसाचं थैमान! SRH vs GT सामना रद्द झाल्यास संपुष्टात येईल RCB चं आव्हान?
5
मुलगी हरवल्याप्रकरणी चौकशीसाठी नेलं अन् कोठडीतच तरूणाचा मृत्यू, नेमकं काय झालं?
6
"मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा, गोहत्या करणाऱ्यांना उलटे लटकवून सरळ करू", अमित शाहांचा इशारा
7
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
8
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान
9
"यासारखी अमानुष गोष्ट नाही..."; पंतप्रधान मोदींच्या घाटकोपरमधील रोड शो वरून संजय राऊतांचा हल्लाबोल
10
‘मी त्यांच्यासोबत, जर स्वाती मालिवाल यांना वाटलं तर…’ गैरवर्तन प्रकरणी प्रियंका गांधी यांचं मोठं विधान 
11
"लाचारीच्या सर्व मर्यादा सोडल्या"; जिरेटोप प्रकरणावरून शरद पवारांनी प्रफुल्ल पटेलांना फटकारलं!
12
विकी कौशलची 'ही' इच्छा अजूनही अपूर्णच! म्हणाला, 'कधी करेन माहित नाही पण...'
13
Hina Khan : "40 डिग्रीत वेदनादायक पीरियड क्रॅम्प्सने त्रस्त असताना..."; हिना खानने सांगितला अनुभव
14
आमनेसामने Video: ठाकरे गटाकडून 50 खोकेची घोषणाबाजी; एकनाथ शिंदेंकडून धनुष्यबाणाचा इशारा
15
‘पृथ्वीराज चव्हाण यांनी पोपट घेऊन भविष्यवाणी सांगण्यास बसावे’, अजित पवार गटाचा टोला 
16
‘मोदींनी एकदा मला फोन केला आणि म्हणाले, माझा अमेरिकेचा व्हिसा फेटाळलाय, तेव्हा मीच…’ शरद पवार यांनी सांगितली आठवण
17
मराठमोळ्या अभिनेत्रीसोबत रिलेशनशीपमध्ये होता 'हीरामंडी'चा अभिनेता, आता ब्रेकअपबाबत केला खुलासा
18
"महिलांच्या कमावण्याच्या नादात वाढतंय घटस्फोटाचं प्रमाण"; सईद अन्वरचं वादग्रस्त विधान! VIDEO व्हायरल
19
T20 WC पूर्वी भारतीय संघाच्या सराव सामन्याची तारीख व संघ ठरला! जाणून घ्या अपडेट्स 
20
Adani Group : अदानींच्या 'या' कंपनीला मोठा झटका, नॉर्वेच्या सर्वात मोठ्या वेल्थ फंडानं केलं ब्लॅकलिस्ट

जिल्ह्यात तीन अपघातात चौघांचा मृत्यू, एक गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2020 5:00 AM

भंडारा शहरातील खांबतलाव चौक परिसरात एसटी खाली चिरटून तरुण ठार झाला तर वरठी येथील सनफलॅग कंपनीत लोकोपायलट खाली आल्याने कामगार चिरडला गेला. रविवार जिल्ह्यासाठी जणू अपघातवार ठरला.

ठळक मुद्देरविवार ठरला अपघातवार : भंडारा, चुल्हाडफाटा व वरठीतील घटना

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्ह्यात तीन वेगवेगळ्या अपघातात चौघांचा मृत्यू झाला. तर एक जण गंभीर जखमी झाला. भंडारा - पवनी मार्गावर चुल्हाड फाट्यावर ओव्हरटेल करण्याच्या प्रयत्नात मालवाहू वाहन ट्रेलरवर आदळल्याने दोनजण ठार तर एक जण गंभीर जखमी झाला. भंडारा शहरातील खांबतलाव चौक परिसरात एसटी खाली चिरटून तरुण ठार झाला तर वरठी येथील सनफलॅग कंपनीत लोकोपायलट खाली आल्याने कामगार चिरडला गेला. रविवार जिल्ह्यासाठी जणू अपघातवार ठरला.कोंढा-कोसरा येथील वार्ताहराने दिलेल्या माहितीनुसार, चुल्हाड फाट्यावर झालेल्या अपघातात गुरुदेव रामदास घोडमारे (२५), सौरभ रमेश राणे (१४) दोघे रा. तिर्री मिन्सी हे दोघे जागीच ठार झाले. तर चालक उत्तम बाबुराव रणदिवे (३५) हा गंभीर जखमी झाला. पवनी तालुक्यातील तिर्री येथील टाटा एस मालवाहू वाहन (क्रमांक एम एच ३१ डीएस १९९८) पालोरा चौ. येथील कुकुटपालन केंद्रावर जात होते. पवनी - भंडारा राज्यमार्गावरुन जातांना चुल्हाड फाट्यावर समोर असलेल्या ट्रेलरला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करतांना अचानक मालवाहू वाहन ट्रेलरला जावून धडकले. धडक एवढी भीषण होती की ट्रेलरसह मालवाहू वाहन रस्त्याच्या कडेला फेकल्या गेले. यात मालवाहू वाहनातील गुरुदेव आणि सौरभ जागीच ठार झाले. तर चालक उत्तम रणदिवे गंभीर जखमी झाला. अपघाताची माहिती होताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमीला भंडाराच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या अपघातात ठार झालेला सौरभ हा आमगाव येथील गुरुदेव आश्रम शाळेत नवव्या वर्गात शिकत होता. प्रकृती बरी नसल्याने तो गावी आला होता. सहज म्हणून तो या वाहनातून जात असताना काळाने त्याच्यावर घाला घातला. तर गुरुदेव हा शेतमजुरी करणारा तरुण आहे. या अपघाताचे वृत्त गावात माहित होताच संपूर्ण गावावर शोककळा पसरली.भंडारात एसटी बसखाली तरुण चिरडलारस्त्यावरील खड्डे चुकविण्याच्या प्रयत्नात एसटी बसखाली चिरडून तरुण जागीच ठार झाल्याची घटना येथील खांबतलाव चौक परिसरात रविवारी सायंकाळी ५.४५ वाजता घडली. प्रशांत नानाजी नवखरे (३६) रा. तकीया वॉर्ड भंडारा असे मृताचे नाव आहे. तो खात रोडवरुन राजीव गांधी चौकाकडे आपल्या दुचाकीने येत होता. शितला माता मंदिर परिसरात रस्त्याचे काम खोळंबल्याने मोठे खड्डे पडले आहे. हे खड्डे वाचविण्याच्या प्रयत्नात तो खाली कोसळला आणि त्याचवेळी मागाहून आलेली एसटी बसचे चाक त्याच्या अंगावरुन गेले. त्यामुळे तो जागीच ठार झाला. राजीव गांधी चौकात येथील त्याचे उपहारगृह होते. दोन वर्षापुर्वी त्याचा विवाह झाला होता. त्याला नऊ महिन्याची मुलगी आहे. या अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती.सनफ्लॅगमध्ये कटून कामगार ठारवरठी : रात्रपाळीत कामावर जाणारा कामगार लोकोपायलटखाली कटून ठार झाल्याची घटना मोहाडी तालुक्यातील वरठी येथील सनफ्लॅग कंपनीत शनिवारी रात्री ९.४५ वाजताच्या सुमारास घडली. शिवशंकर वंजारी (५३) असे मृताचे नाव आहे. तो कंत्राटी कामगार म्हणून सिंटर विभागात कार्यरत होता. शनिवारी रात्री नेहमीप्रमाणे तो आपल्या कामावर जात होता. त्यावेळी रुळ ओलांडताना कंपनीतील लोकोपायलटच्या इंजीनखाली तो आला. त्यात कटून गंभीर जखमी झाला. तात्काळ कंपनीतील आरोग्य केंद्रात उपचारासाठी नेण्यासाठी गंभीर दुखापत असल्याने त्याला नागपूर येथे नेत असतांना वाटेतच त्याचा मृत्यू झाला. त्याच्यामागे पत्नी, दोन मुली, एक मुलगा असा परिवार आहे. घरातील एकमेव कमावता व्यक्ती या अपघातात ठार झाल्याने कुटूंबावर मोठे संकट ओढवले आहे. विशेष म्हणजे सिंटर विभागात काम करण्यासाठी जाणाऱ्या कामगारांना रुळ ओलांडूनच जावे लागते. या घटनेने कपंनीत शोककळा पसरली आहे. मृतकाच्या वारसांना नोकरी देण्याची मागणी आहे.