जनावरांच्या अवैध वाहतूकप्रकरणी चौघांवर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2019 06:00 IST2019-09-24T06:00:00+5:302019-09-24T06:00:48+5:30
लाखनी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दामदेव मंडलवार यांना गोपनीय माहिती मिळाली की, रेंगेपार कोहळी येथे जनावरांची अवैध वाहतूक होत आहे. यात जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनानुसार मंडलवार यांनी सापळा रचला. या पथकाने केलेल्या कारवाईत चारचाकी, टाटा एस वाहनातून जनावरांची वाहतूक होत असल्याचे निदर्शनास आले.

जनावरांच्या अवैध वाहतूकप्रकरणी चौघांवर गुन्हा
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : गोपनीय माहितीच्या आधारावर जनावरांची अवैध वाहतूक करणाऱ्या चार जणांवर लाखनी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई रविवारी करण्यात आली. याप्रकरणी राजेश सार्वे रा. सालेभाटा, यादोराव महागा कापगते रा. रेंगेपार (कोहळी), निलेश तरोणे व हेमंत भेंडे दोन्ही रा. पिंपळगाव अशी गुन्हा दाखल केलेल्या इसमांची नावे आहेत.
लाखनी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दामदेव मंडलवार यांना गोपनीय माहिती मिळाली की, रेंगेपार कोहळी येथे जनावरांची अवैध वाहतूक होत आहे. यात जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनानुसार मंडलवार यांनी सापळा रचला. या पथकाने केलेल्या कारवाईत चारचाकी, टाटा एस वाहनातून जनावरांची वाहतूक होत असल्याचे निदर्शनास आले. यावेळी रेंगेपार येथील विनायक मुंगमोड यांनीही हा प्रकार उघडकीला येण्यास मदत केली. त्यांनी याची माहिती माजी उपसरपंच मनोहर बोरकर यांनाही दिली. वाहन क्रमांक एमएच ३६ एफ २४४५ मधून या जनावरांची अवैध वाहतूक होत असल्याचे उघडकीला आले. अपुºया जागेत जनावरांना कोंबून नेण्यात येत होते. झालेल्या तपासणीत अवैध वाहतूक करताना त्यांच्याकडे जनावरे वाहतूक करण्याचा परवाना, वैद्यकीय प्रमाणपत्र व चारापाण्याची व्यवस्था नसल्याचे आढळून आले. विशेष म्हणजे सदर जनावरे कत्तलीकरीता घेवून जात असल्याचे दिसून आल्याने चौघांविरूद्ध लाखनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर जनावरे खैरी पिंपळगाव येथील सूकृत बहुउद्देशिय गौरक्षण संस्थेत पाठविण्यात आले आहेत.
सदर कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद साळवे, अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक मंडलवार, पोलीस हवालदार पठाण व त्यांच्या सहकार्यांनी केली