बनावट दस्तऐवजाआधारे चार लाख रुपये हडपले
By Admin | Updated: March 9, 2016 01:37 IST2016-03-09T01:37:51+5:302016-03-09T01:37:51+5:30
मयत व्यक्तीचे खोटे वारसान दाखले जोडून, पुनर्वसन विभागाकडून मौजा पिपरी प.ह.नं. ४ अंतर्गत भूखंड क्रमांक १८० च्या घराचे मोबदला म्हणून ४ लक्ष ४९ हजार ८६२ रुपये ....

बनावट दस्तऐवजाआधारे चार लाख रुपये हडपले
चवरे यांचा आरोप : पदाधिकारी, कर्मचाऱ्यांविरुद्ध कारवाईची मागणी
जवाहरनगर : मयत व्यक्तीचे खोटे वारसान दाखले जोडून, पुनर्वसन विभागाकडून मौजा पिपरी प.ह.नं. ४ अंतर्गत भूखंड क्रमांक १८० च्या घराचे मोबदला म्हणून ४ लक्ष ४९ हजार ८६२ रुपये माजी सरपंच नाशिक चवरे रा.पिपरी जवाहरनगर यांनी लंपास केले. या आशयाची तक्रार नरेंद्र पंढरी चवरे व इतर तीन इसमांनी दि. ३ मार्च २०१६ रोजी दिलेल्या तक्रारीत नमूद केले. दोषींवर कारवाई न केल्यास उपोषण करण्याचा इशारा दिला.
जिल्ह्यातील पश्चिम सिमेवर पूर बाधीत पिपरी गाव आहे. येथील रहिवासी चंद्रभागा जयराम मेश्राम राहत होती. कालांतराने वृद्धापकाळाने तिचे निधन झाले. तिच्याकडे पती वा मुल नाही. याच गावात राहणारा व चंद्रभागाचा भाचा माजी सरपंच नाशिक लिलाधर चवरे यांनी सरपंच पदावर असताना ग्रामपंचायतकडून वारसान दाखला तयार केला. विशेष बाब म्हणजे वारसान प्रमाणपत्रावर ग्रामसेवक एन.डी. गोटेफोडे व अर्जदार स्वत: सरपंच म्हणून सही केली.
दुसरी बाब म्हणजे पिपरी येथील साझा क्रमांक ४ चे तत्कालीन तलाठी त्रिभूवनकर यांनी कसल्याही प्रकारचा जाहीरनामा न काढता परस्पर नासिक चवरे हे चंद्रभागाचे वारसान दाखला दि. २५ आॅक्टोबर २०१३ रोजी दिला. यात लिखान २५ नोव्हेंबर २०१३ रोज करण्यात येतो. मात्र प्रभारी तलाठी मिनाक्षी रामटेके व पोलीस पाटील यांच्या चौकशी अहवालानुसार दि. २ फेब्रुवारी २०१६ रोजीच्या वारसान दाखल्यानुसार चंद्रभागा जयराम मेश्राम यांच्या मृत्यूनंतर कोणीही वारस नाही. चंद्रभागाला भाऊबहिण जिवंत असताना एकटा भाचा वारस कसा झाला. यात मोठे घबाड झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. माजी सरपंच नाशिक चवरे यांनी सरपंचपदावर असताना पदाचा दुरुपयोग करीत खोटे दाखल्याच्या बळावर शासन निर्णय क्र. आरपीए - ०२१०/प्र.क्र.६९/(भाग २) र - १ मंत्रालय मुंबई दिनांक १८ जून २०१३ मध्ये पहिल्या व दुसऱ्या टप्पा मिळून ४ लक्ष ४९ हजार ८६२ रुपये लंपास केल्याची तक्रार कोंढी येथील रहिवासी नरेंद्र पंढरी चवरे व गोपीचंद चवरे, रुपचंद चवरे, राजू चवरे यांनी दि. ३ मार्च २०१६ रोजी दिलेल्या तक्रारीत वरील बाबींची नोंद केली. दोषींवर कारवाई करण्याीच मागणी सदर तक्रारकर्त्यांनी केली. मागणी मान्य न झाल्यास उपोषणावर बसण्याचा इशारा दिला. (वार्ताहर)
मोटरसायकलच्या धडकेत जखमी
भंडारा : भरधाव वेगाने जाणारी एमएच १२ सीएम ३६२८ व एमएच ३६ टी ९१६ या दुचाकीमध्ये धडक झाली. ही धडक बोथली शिवारात झाली. यात दुचाकीवरील युवक जखमी झाल्याने वरठी पोलिसांनी दुचाकी चालकांविरूद्ध गुन्हा नोंदविला आहे. तपास पोलीस नायक खोकले करीत आहे. (शहर प्रतिनिधी)