शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

भंडारा जिल्ह्यातील काँग्रेसचे माजी खासदार केशवराव पारधी यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2018 12:40 IST

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी खासदार केशवराव आत्माराम पारधी यांचे रविवारी सायंकाळी ६.३० वाजता तुमसर येथे निवासस्थानी हृदयविकाराने निधन झाले. ते ९० वर्षाचे होते. त्यांनी भंडारा लोकसभेचे दोनदा, तुमसर विधानसभेचे दोनदा आणि तुमसरचे नगराध्यक्षपदही दोनदा भुषविले होते.

ठळक मुद्देजुन्या काळातील नेता पडदाआड भंडारा लोकसभा व तुमसर विधानसभेचे केले नेतृत्व

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी खासदार केशवराव आत्माराम पारधी यांचे रविवारी सायंकाळी ६.३० वाजता तुमसर येथे निवासस्थानी हृदयविकाराने निधन झाले. ते ९० वर्षाचे होते. त्यांनी भंडारा लोकसभेचे दोनदा, तुमसर विधानसभेचे दोनदा आणि तुमसरचे नगराध्यक्षपदही दोनदा भुषविले होते.जुन्या काळातील काँग्रेसचे निष्ठावंत नेते आणि माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे निकटस्थ केशवराव पारधी यांच्या निधनाचे वृत्त कळताच जिल्ह्यावर शोककळा पसरली. रविवारी दिवसभर त्यांची दिनचर्या व्यवस्थीत होती. सायंकाळी ६.३० वाजता त्यांना अस्वस्थ वाटू लागले आणि त्यातच हृदयविकाराचा धक्का बसून मृत्यू झाला. अत्यंत सामान्य स्थितीत असलेल्या कुटूंबात त्यांचा जन्म झाला होता. काही वर्ष त्यांनी तुमसरचे प्रसिध्द उद्योगपती दुर्गाप्रसाद सराफ यांच्याकडे नोकरी केली होती. मृदभाषी केशवराव पारधी यांनी राजकारणाची सुरुवात तुमसर नगरपरिषदेतून केली होती. नगराध्यक्ष ते आमदार, खासदार असा त्यांचा राजकीय प्रवास होता.आणीबाणीच्या काळात केशवराव माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या सोबत भक्कमपणे उभे होते. तुमसरात प्रथमच इंदिरा गांधी त्यांच्या प्रचारासाठी आल्या होत्या. गांधी कुटूंबियांशी त्यांचे घनिष्ठ संबंध होते. माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनी त्यांना दुसऱ्यांदा खासदारकीची तिकीट दिली होती. १९८९ मध्ये त्यांचा लोकसभेत पराभव झाला त्यानंतर माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांनी त्यांना विधान परिषदेची उमेदवारी दिली होती.केशवराव पारधी यांच्या मागे तीन मुले, एक मुलगी असा आप्त परिवार आहे. सोमवार ३० जुलै रोजी १२.३० वाजता त्यांच्या पार्थिवावर तुमसर येथील वैनगंगा घाटावर अत्यसंस्कार करण्यात येणार आहे.अल्प परिचयमाजी खासदार केशवराव पारधी यांचा जन्म ३१ आॅगस्ट १९२९ रोजी झाला होता. ते १९६४ ते १९६७ व १९७० ते १९७२ पर्यंत तुमसरचे नगराध्यक्ष होते. १९६७ ते १९७८ पर्यंत सलग दोनदा आमदार होते. १९७९ ते १९८९ या काळात त्यांनी भंडारा लोकसभेचे प्रतिनिधीत्व केले.

टॅग्स :congressकाँग्रेस