माजी आमदार राजेश काशीवार यांचा भाजप प्रदेश सदस्यत्वाचा राजीनामा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2022 05:00 IST2022-06-02T05:00:00+5:302022-06-02T05:00:47+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजपच्या सैध्दान्तिक विचारांना आपण नेहमीच बांधिल राहणार, असे त्यांनी म्हटले आहे. नुकत्याच साकोली येथे ना. नितीन गडकरी यांच्या हस्ते साकोली उड्डाणपुलांच्या लोकार्पण सोहळ्यानंतर काशीवार यांनी राजीनामा दिला आहे. गत विधानसभा निवडणुकीपासूनच भाजपमध्ये आलबेल नसल्याची चर्चा होती. जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष व विषय समित्यांच्या निवडणुकीप्रसंगी जिल्हा भाजप वेगवेगळ्या गटांमध्ये विखूरल्याचे दिसून आले.

माजी आमदार राजेश काशीवार यांचा भाजप प्रदेश सदस्यत्वाचा राजीनामा
लोकमत न्यूज नेटवर्क
साकोली : साकोलीचे माजी आमदार व महाराष्ट्र प्रदेश भाजप कार्यकारिणी सदस्य राजेश उर्फ बाळा काशीवार यांनी कार्यकारिणी सदस्यत्वाचा तडकाफडकी राजीनामा दिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. भंडारा जिल्हा भाजप संघटनेची आजची परिस्थिती बघता संघटनात्मक कार्य करण्यास मी मानसिकदृष्ट्या असमर्थ असल्याचे कारण त्यांनी दिले आहे. या जबाबदारीतून मुक्त करावे, असे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील यांना पाठविलेल्या राजीनाम्यात नमूद केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजपच्या सैध्दान्तिक विचारांना आपण नेहमीच बांधिल राहणार, असे त्यांनी म्हटले आहे. नुकत्याच साकोली येथे ना. नितीन गडकरी यांच्या हस्ते साकोली उड्डाणपुलांच्या लोकार्पण सोहळ्यानंतर काशीवार यांनी राजीनामा दिला आहे. गत विधानसभा निवडणुकीपासूनच भाजपमध्ये आलबेल नसल्याची चर्चा होती. जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष व विषय समित्यांच्या निवडणुकीप्रसंगी जिल्हा भाजप वेगवेगळ्या गटांमध्ये विखूरल्याचे दिसून आले. जिल्ह्यात भाजप तीन गटात विखुरल्याची चर्चा रंगत असतानाच काशीवार यांच्या राजीनाम्याने ही चर्चा खरी तर नाही ना! असा संशय व्यक्त केला जात आहे.