भंडारा जिल्ह्यातील माजी आमदार सेवक वाघाये अपघातातून थोडक्यात वाचले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2022 20:48 IST2022-05-21T20:47:21+5:302022-05-21T20:48:03+5:30
Bhandara News साकोलीचे माजी आमदार सेवक वाघाये चारचाकीने अकोला येथे जात असताना त्यांच्या वाहनाला ट्रकने मागून धडक दिली. यात वाघाये हे थोडक्यात बचावले.

भंडारा जिल्ह्यातील माजी आमदार सेवक वाघाये अपघातातून थोडक्यात वाचले
भंडारा : साकोलीचे माजी आमदार सेवक वाघाये चारचाकीने अकोला येथे जात असताना त्यांच्या वाहनाला ट्रकने मागून धडक दिली. यात वाघाये हे थोडक्यात बचावले. हा अपघात शुक्रवारी पहाटे ३.३० वाजेच्या सुमारास झाला. सुदैवाने त्यांच्यासोबत असलेल्या दोन व्यक्तीही थोडक्यात बचावल्या.
वाघाये हे आपल्या चारचाकी क्रमांक एमएच ०२ डीजे ३७८६ ने नागपूरहून अकोलाकडे जात होते. याचदरम्यान मागून कोळसा भरलेल्या ट्रकने त्यांच्या कारला धडक दिली. सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नसली तरी वाहनाचे नुकसान झाले. थोडे दूर जाऊन वाहन थांबविले. ट्रक चालकानेही वेळीच ब्रेक दाबल्याने मोठा अनर्थ टळला. उल्लेखनीय म्हणजे गतवर्षी वाघाये यांचा असाच अपघात झाला होता.