शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
2
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
3
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
4
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
5
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
6
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
7
गाळ काढताना विहिरीत हाती लागली ‘गधेगळ’, चौदाव्या शतकातील ऐतिहासिक ठेवा जोपासणार
8
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
9
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
10
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
11
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
12
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
13
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
14
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
15
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
16
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
17
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
18
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
19
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
20
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
Daily Top 2Weekly Top 5

देवसर्ऱ्यात फलकाची औपचारिकताच

By admin | Updated: November 9, 2014 22:29 IST

देवसर्रा येथील ग्रामपंचायत अंतर्गत गावात पांदण रस्त्याचे काम करण्यात आली आहेत. परंतु या कामाची माहिती दर्शविणारी फलक फक्त औपचारिकताच दाखवित असल्याने निधी खर्चात

चुल्हाड (सिहोरा) : देवसर्रा येथील ग्रामपंचायत अंतर्गत गावात पांदण रस्त्याचे काम करण्यात आली आहेत. परंतु या कामाची माहिती दर्शविणारी फलक फक्त औपचारिकताच दाखवित असल्याने निधी खर्चात आलबेल असल्याचा सूर गावात आहे.तुमसर बपेरा राज्य मार्गावरील दीड हजार लोकवस्तीच्या देवसर्रा गावात विकासाचा अनुशेष आहे. गावात अंतर्गत विकास झालेला नाही. राज्य मार्गावरून गावात प्रवेश करणारा खडीकरण रस्ता जागोजागी उखडला आहे. याच गावातील अन्य रस्तेही याच स्थितीत आहेत. सिमेंट रस्ते खड्डेमय झाली आहेत. गावात महाराष्ट्र ग्रामीण रोजगार रोजगार हमी योजनेअंतर्गत मजुरांना कामे उपलब्ध करण्यासाठी पांदण रस्त्याचे माती आणि मुरुम कामे करण्यात आली आहे. कुशल आणि अकुशल असे या कामाचे स्वरुप आहेत. या कामावर पंचायत समितीच्या रोहयो विभागाचे नियंत्रण आहणे. कुशल कामाचे देयक याच विभागामार्फत काढण्यात येत आहे. शाखा अभियंता यांच्या चौकशीनंतर अंतिम देयके वितरीत केली जात आहेत. कामाची माहिती निधी दर्शविणारे फलक लावणे, अनिवार्य करण्यात आले आहे. त्या प्रमाणे या ग्रामपंचायत अंतर्गत बपेरा रोड ते पवनलाल बिसने यांच्या शेतापर्यंत पांदण रस्त्याचे आधी मातीकाम करण्यात आले आहे. नंतर याच पांदन रस्त्याचे कुशल कामावर मुरुम घालण्यात आलेला आहे. परंतु माहिती दर्शविणारा फलक कोरा (रिकामा) ठेवण्यात आलेला आहे. या पांदन रस्तयाच्या कामात तांत्रिक मान्यता, प्रशासकीय मंजुरी, कार्यारंभ आदेश क्र. कामावर झालेला खर्च, कुशल आणि अकुशल काम सुरु झाल्याचा दि. तथा काम पूर्ण झाल्याचा दि. आदी रिकामे आहेत. परंतु या फलकावर मात्र सरपंच, उपसरपंच आणि सचिव यांची नावे लिहिण्यास विसरण्यात आले नाही. यावरून हा फलक फक्त औपचारिकताच दर्शवित आहे. दरम्यान पांदन रस्त्याची चौकशी करीत असताना शाखा अभियंता यांच्या ध्यानीमनी हे आले नाही. या कामाचे संपूर्ण देयकाची उचल करण्यात आली आहे. माहिती दर्शविणाऱ्या फलकात अत्यावश्यक खर्चाची माहिती दडविण्यात आल्याने संशय निर्माण झालेला आहे. (वार्ताहर)