शहरं
Join us  
Trending Stories
1
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
2
Top Marathi News LIVE Updates: युद्धविरामावरूनच वाक्-युद्ध! अमेरिकेच्या अटी इराणला अमान्य
3
शांतता चर्चेसाठी प्रयत्न, मुनीर यांचा ट्रम्प यांना फोन; म्हणाले, “होर्मुझची नाकेबंदी...”
4
"हजारोंसे भारी... एक नारी!" रोहित पवारांकडून 'त्या' रणरागिणीचं कौतुक; पोलिसांच्या कारवाईवरून सरकारला ठणकावलं
5
हर हर महादेव... केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडले, मंत्रोच्चाराने दुमदुमला परिसर, भक्तांची रीघ
6
BEST: ‘बेस्ट’कडून ५०० मिडी बसची खरेदी, समितीची मंजुरी; सरकारकडे प्रस्ताव
7
"त्या जागेने माझं सर्वस्व हिरावलं, योगींची भेट..."; दहशतवादी हल्ल्यात पती गमावलेल्या ऐशान्याची व्यथा
8
महिनाभरातच नेपाळमधील बालेन शाह सरकारविरोधात जनआक्रोष, ‘या’ दोन मुद्द्यांवरून नाराजी
9
कार्ड बदललं तरी ऑटोमॅटिक पेमेंट थांबणार नाही; ₹१५,००० पर्यंत OTP-पासवर्डची गरजही भासणार नाही
10
Leopard Attack: कसारा-कळभोंडेत बिबट्याच्या हल्ल्यात ८ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
11
मन रानात गेलं गं! अश्विनी भावे यांचा शेतात मनसोक्त फेरफटका; सोशल मीडियावर दाखवली झलक
12
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
13
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार विक्री; सेन्सेक्स ५०० अंकांनी तर निफ्टी २४,४५० च्या खाली, IT इंडेक्समध्ये मोठी घसरण
14
India-China Big Tension: इराण युद्ध… कच्च्या तेलानं बिघडवला खेळ; भारत-चीनला झटका, आली 'ही' वाईट बातमी
15
Mumbai Local: दुहेरी ब्लॉकने मुंबईकर त्रस्त; नोकरदारांना सलग दुसऱ्या दिवशी ‘लेटमार्क’चा फटका 
16
गुरुपुष्यामृत योग २०२६: नशीब पालटणारा सुवर्ण मुहूर्त! २३ एप्रिल, गुरुपुष्यामृत योग 'या' राशींसाठी ठरणार खास!
17
मुंबई फिरायला आलेली चिमुरडी गर्दीत हरवली, पोलिसांनी झटपट पावले उचलली; पालकांकडे सुखरूप सोपवले
18
CSMT: सीएसएमटीवर मोठा अनर्थ टळला! चुकीच्या सिग्नलमुळे दोन लोकल एकाच ट्रॅकवर; नेमकं काय घडलं?
19
"हरलेल्यांनी अटी घालायच्या नसतात..."; ट्रम्पचा शस्त्रसंधी वाढवण्याचा निर्णय इराणने धुडकावला
20
Government Employees Strike: मंत्रालयातील निम्मे कर्मचारी संपावर, कामकाजावर मोठा परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

मुख्य वनसंरक्षकांनी पिंजून काढला जंगल

By admin | Updated: August 27, 2016 00:17 IST

रुबाबदार शैलीने भुरळ पाडणारा व आशिया खंडातील सर्वात मोठा वाघ ‘जय’ हा मागील चार महिन्यांपासून बेपत्ता असल्याने सर्व लोक चिंतेत पडले आहेत.

‘जय’ वाघाचा शोध सुरूच : जंगलात १०० ट्रॅप कॅमेरे प्रकाश हातेल  चिचाळरुबाबदार शैलीने भुरळ पाडणारा व आशिया खंडातील सर्वात मोठा वाघ ‘जय’ हा मागील चार महिन्यांपासून बेपत्ता असल्याने सर्व लोक चिंतेत पडले आहेत. दुसरीकडे मुख्य वनसंरक्षक एस. एम. रेड्डी यांनी स्वत: सुत्रे हातात घेत वनाधिकाऱ्यांसह जंगल पिंजुन काढला. यावेळी त्यांच्या सोबत उपमुख्य वनसंरक्षक उमेश वर्मा व अड्याळचे वनक्षेत्राधिकारी पी. जी. महेश पाठक, पवनीचे आर. एफ.ओ. दादा राऊत, भंडाराचे आर. एफ. ओ. मेश्राम, येटवाईचे पोलीस पाटील राजेश वरखेडे यांचा सहभाग होता. वनविभागाने विदर्भातील संपूर्ण अभयारण्य पालथे घातले. मात्र ‘जय’चा थांगपत्ता लागला नाही. पंरतु चिचाळ येथील माजी सरपंच मुनिश्वर काटेखाये हे लाखनीहून १२ जुलैला येत असताना त्यांना रात्रीला पुरकाबोडी-येटवाई जंगलात ‘जय’चे दर्शन झाले. ही बाब वनखात्याच्या निदर्शनात आणून दिली त्यानुसार वनखात्याने काटेखाये यांनी दाखविलेल्या ठिकाणी वाघाचे ‘पगमार्क’ आढळून आले.तरीही वनखात्याने या बाबीकडे गांर्भीर्य दाखविले नाही. दुसरीकडे ‘जय’ची हत्या झाल्याचेही बोलल्या जात आहे. त्या अनुषंगाने वनमंत्रालयाने पुन्हा दखल घेतली. काटेखाये यांनी सांगितेल्या स्थानावर पुन्हा नव्याने शोध मोहिम सुरु केली. त्यात त्यांना वाघाची विष्ठा, त्याच्या शरिरावरील केस आढळले. परिसर मोठा असल्यने याठिकाणी १०० ट्रॅप कॅमेरे लावण्याचे आदेश मुख्य वनसंरक्षकांनी वनाधिकाऱ्यांना दिले. मात्र माजी सरपंच यांनी १२ जुलैला याबाबत मुख्य वनसंरक्षक एस. एम. रेड्डी व प्रधान मुख्य वनसंरक्षकांना यांच्या दालनात प्रत्यक्ष बयान दिले आहे. त्याचवेळी संबंधित अधिकाऱ्यांनी स्थानिक वनाधिकाऱ्यांना तसे आदेश दिले पंरतु यानी आजमितीलाही त्या ठिकाणी कॅमेरे ट्रॅप केलेले नाही. आदेशाचे पालन झाले असते तर सत्य समोर आले असते. मी स्वत: हा जंगल पाहिला आहे. तो ‘जय’च्या वास्तव्यास अनुकूल आहे. जंगलात मिळालेली विष्ठा आणि केस े डि.एन.ए. तपासणीसाठी पाठवित आहोत. या परिसरात लवकरच १०० कॅमेरे लावण्यात येतील.- एस. एम. रेड्डी, मुख्य नवसंरक्षक, नागपूरवाघाला नवीन जागी व वातावरणाशी एकरूप करण्याकरिता दोन महिन्यांचा कालावधी लागतो. त्यानंतरच त्याचे अस्तित्व कळत असते. - उमेश वर्मा, वनसंरक्षक, भंडारादिलेल्या माहितीनुसार शोध घेण्यात आला पंरतू मधातच तो शोध बंद केला आणि पुन्हा याच ठिकाणी दिड महिन्याने शोध सुरु झाला. मधल्या काळात वनविभागाने ट्रॅप कॅमेरे लावले असते तर आज पर्यंत ‘जय’ दिसून आला असता.- मुनिश्वर काटेखाये, माजी सरपंच, चिचाळ