मुख्य वनसंरक्षकांनी पिंजून काढला जंगल
By Admin | Updated: August 27, 2016 00:17 IST2016-08-27T00:17:49+5:302016-08-27T00:17:49+5:30
रुबाबदार शैलीने भुरळ पाडणारा व आशिया खंडातील सर्वात मोठा वाघ ‘जय’ हा मागील चार महिन्यांपासून बेपत्ता असल्याने सर्व लोक चिंतेत पडले आहेत.

मुख्य वनसंरक्षकांनी पिंजून काढला जंगल
‘जय’ वाघाचा शोध सुरूच : जंगलात १०० ट्रॅप कॅमेरे
प्रकाश हातेल चिचाळ
रुबाबदार शैलीने भुरळ पाडणारा व आशिया खंडातील सर्वात मोठा वाघ ‘जय’ हा मागील चार महिन्यांपासून बेपत्ता असल्याने सर्व लोक चिंतेत पडले आहेत. दुसरीकडे मुख्य वनसंरक्षक एस. एम. रेड्डी यांनी स्वत: सुत्रे हातात घेत वनाधिकाऱ्यांसह जंगल पिंजुन काढला. यावेळी त्यांच्या सोबत उपमुख्य वनसंरक्षक उमेश वर्मा व अड्याळचे वनक्षेत्राधिकारी पी. जी. महेश पाठक, पवनीचे आर. एफ.ओ. दादा राऊत, भंडाराचे आर. एफ. ओ. मेश्राम, येटवाईचे पोलीस पाटील राजेश वरखेडे यांचा सहभाग होता.
वनविभागाने विदर्भातील संपूर्ण अभयारण्य पालथे घातले. मात्र ‘जय’चा थांगपत्ता लागला नाही. पंरतु चिचाळ येथील माजी सरपंच मुनिश्वर काटेखाये हे लाखनीहून १२ जुलैला येत असताना त्यांना रात्रीला पुरकाबोडी-येटवाई जंगलात ‘जय’चे दर्शन झाले. ही बाब वनखात्याच्या निदर्शनात आणून दिली त्यानुसार वनखात्याने काटेखाये यांनी दाखविलेल्या ठिकाणी वाघाचे ‘पगमार्क’ आढळून आले.तरीही वनखात्याने या बाबीकडे गांर्भीर्य दाखविले नाही. दुसरीकडे ‘जय’ची हत्या झाल्याचेही बोलल्या जात आहे. त्या अनुषंगाने वनमंत्रालयाने पुन्हा दखल घेतली. काटेखाये यांनी सांगितेल्या स्थानावर पुन्हा नव्याने शोध मोहिम सुरु केली. त्यात त्यांना वाघाची विष्ठा, त्याच्या शरिरावरील केस आढळले. परिसर मोठा असल्यने याठिकाणी १०० ट्रॅप कॅमेरे लावण्याचे आदेश मुख्य वनसंरक्षकांनी वनाधिकाऱ्यांना दिले. मात्र माजी सरपंच यांनी १२ जुलैला याबाबत मुख्य वनसंरक्षक एस. एम. रेड्डी व प्रधान मुख्य वनसंरक्षकांना यांच्या दालनात प्रत्यक्ष बयान दिले आहे. त्याचवेळी संबंधित अधिकाऱ्यांनी स्थानिक वनाधिकाऱ्यांना तसे आदेश दिले पंरतु यानी आजमितीलाही त्या ठिकाणी कॅमेरे ट्रॅप केलेले नाही. आदेशाचे पालन झाले असते तर सत्य समोर आले असते.
मी स्वत: हा जंगल पाहिला आहे. तो ‘जय’च्या वास्तव्यास अनुकूल आहे. जंगलात मिळालेली विष्ठा आणि केस े डि.एन.ए. तपासणीसाठी पाठवित आहोत. या परिसरात लवकरच १०० कॅमेरे लावण्यात येतील.
- एस. एम. रेड्डी, मुख्य नवसंरक्षक, नागपूर
वाघाला नवीन जागी व वातावरणाशी एकरूप करण्याकरिता दोन महिन्यांचा कालावधी लागतो. त्यानंतरच त्याचे अस्तित्व कळत असते.
- उमेश वर्मा, वनसंरक्षक, भंडारा
दिलेल्या माहितीनुसार शोध घेण्यात आला पंरतू मधातच तो शोध बंद केला आणि पुन्हा याच ठिकाणी दिड महिन्याने शोध सुरु झाला. मधल्या काळात वनविभागाने ट्रॅप कॅमेरे लावले असते तर आज पर्यंत ‘जय’ दिसून आला असता.
- मुनिश्वर काटेखाये, माजी सरपंच, चिचाळ