लॉकडाऊनमध्ये वन विभागाचे अधिकारी कर्मचारी जंगलातच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2020 05:00 IST2020-04-21T05:00:00+5:302020-04-21T05:00:33+5:30
लाखांदूर वनपरिक्षेत्र कार्यालय अंतर्गत लाखांदूर व दिघोरी (मोठी) अशी दोन वनक्षेत्र कार्यालये अस्तित्वात आहेत. गत महिनाभरापुर्वी शासनाने लॉकडाऊन केल्यानंतर सदर संधीचा फायदा घेण्यासाठी काही वनतस्करांनी कंबर कसली होती. दरम्यान येथील वनपरीक्षेत्राधिकाऱ्यांच्या नेतृत्वात सर्वत्र वनव्याप्त भागात लॉकडाऊन असल्याने जंगलात जंगलबंदी केल्याने जवळपास अनेक तस्करांच्या मुसक्या आवळल्या गेल्या आहेत.

लॉकडाऊनमध्ये वन विभागाचे अधिकारी कर्मचारी जंगलातच
दयाल भोवते।
लोकमत न्यूज नेटवर्क
लाखांदूर : लॉकडाऊनमध्ये वन्यजीव, अवैध वृक्षतोड व गौण खनिज यासारख्या तस्करीच्या गैरकृत्यावर आळा घालण्यासाठीू कार्यालयीन कार्य पार पाडतानाच निम्याहून अधिक कर्मचारी जंगलातच दिसून येत आहेत. सदरच्या कामगिरीने लाखांदूर वनपरिक्षेत्राअंतर्गत लॉकडाऊनचे शासन निर्देशानुसार पालन केले जात असून त्यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.
लाखांदूर वनपरिक्षेत्र कार्यालय अंतर्गत लाखांदूर व दिघोरी (मोठी) अशी दोन वनक्षेत्र कार्यालये अस्तित्वात आहेत. गत महिनाभरापुर्वी शासनाने लॉकडाऊन केल्यानंतर सदर संधीचा फायदा घेण्यासाठी काही वनतस्करांनी कंबर कसली होती. दरम्यान येथील वनपरीक्षेत्राधिकाऱ्यांच्या नेतृत्वात सर्वत्र वनव्याप्त भागात लॉकडाऊन असल्याने जंगलात जंगलबंदी केल्याने जवळपास अनेक तस्करांच्या मुसक्या आवळल्या गेल्या आहेत.
जंगलव्याप्त परिसरातील गावांमध्ये संबंधित विभागाअंतर्गत शासन निर्देशाचे तंतोतंत पालन केले जावे, असे आवाहन देखील करण्यात आले आहे. या आवाहनाला जनतेने सकारात्मक प्रतिसाद दिल्याने जंगलव्याप्त भागातील अवैध तस्करीचे प्रमाण घटले आहे.
दरम्यान, वनपरीक्षेत्राधिऱ्यांनी लॉकडाऊनच्या काळात मुख्यालयीच राहणे पसंत केल्याने अन्य अधिनस्त अधिकारी व कर्मचारी नियमीत कर्तव्य बजावतांना दिसून येत आहेत. एरवी अवैध वृक्षतोड, गौण खनिज तस्करी व वन्य जीवांची शिकार यांसारख्या होणाºया गैरप्रकारावर लॉकडाऊनमध्ये या विभागातील अधिकारी कर्मचाºयांच्या कर्तव्य तत्परतेने आळा घालण्यात यश आले आहे. हे मात्र विशेष.