अवघा जिल्हा खेळणार आज फुटबॉल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2017 10:27 PM2017-09-14T22:27:48+5:302017-09-14T22:28:05+5:30

भारतामध्ये फिफा अंडर १७ या होणाºया फुटबॉल स्पर्धेच्या अनुषंगाने देशात मिशन १ मिलीयन कार्यक्रम राबविण्यात येत असून .....

Football today to play in the district | अवघा जिल्हा खेळणार आज फुटबॉल

अवघा जिल्हा खेळणार आज फुटबॉल

Next
ठळक मुद्देजिल्हाधिकारी यांच्या हस्ते शुभारंभ : देशभरात मिशन एक मिलियन कार्यक्रम

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : भारतामध्ये फिफा अंडर १७ या होणाºया फुटबॉल स्पर्धेच्या अनुषंगाने देशात मिशन १ मिलीयन कार्यक्रम राबविण्यात येत असून भंडारा जिल्ह्यात मिशन फुटबॉलचा शुभारंभ छत्रपती शिवाजी क्रीडा संकुल येथे ५ सप्टेंबर रोजी सकाळी ७.३० वाजता जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी जवळपास ५०० च्यावर अधिकारी कर्मचारी, क्रीडा संघटक, क्रीडा मार्गदर्शन व खेळाडू उपस्थित राहणार आहे.
भारतामध्ये फिफा अंडर १७ या होणाºया फुटबॉल स्पर्धेच्या अनुषंगाने देशात मिशन ११ मिलियन कार्यक्रम राबविण्यात येत असून या स्पर्धामधील काही स्पर्धा महाराष्ट्रामध्ये डी.आय.पाटील स्टेडियम, नवी मुंबई येथे होणार आहेत. राज्यात फुटबॉल खेळाची आवड निर्माण व्हावी, जास्तीत जास्त मुलांनी मैदानावर खेळ खेळल्यास त्यांचे आरोग्य सुदृढ होण्यास मदत होईल या विचाराने राज्य शासनाने मिशन फुटबॉल १ मिलियन ही योजना जाहीर करुन राज्यात १५ सप्टेंबर २०१७ या दिवशी १ मिलियन मुलांनी आरोग्य व आनंदासाठी फुटबॉल खेळून क्रीडा विषयक वातावरण निर्मितीचा संकल्प करावा. समाजामध्ये व्यायाम व क्रीडा संस्कृती निर्माण करण्याकामी शासनाने राज्यातील सर्व माध्यमिक शाळा व कनिष्ट महाविद्यालयामधील मुले व मुलींसाठी फुटबॉलचे वाटप करुन जिल्हयात मुले व मुली आरोग्य व आनंदासाठी फुटबॉल सामन्यांचे आयोजन करुन खेळण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला आहे.
१५ रोजी होणाºया सामान्यामध्ये कलेक्टर एकादश, क्रीडा विभाग एकादश, पोलीस विभाग, शिक्षण विभाग, आरोग्य विभाग, पत्रकार, अभियंता ग्रृप, स्काऊट गाईड, तसेच जिल्हयातील एकविध जिल्हा क्रीडा संघटनेचे संघ नगर परिषद, जिल्हा सैनिक कार्यालय, सार्वजनिक बांधकाम विभाग, पतंजली ग्रृप, इतर शासकीय विभागाचे संघ सहभागी होणार आहेत.
जिल्हयातील प्रत्येक नागरिकांनी आनंद व व्यायामासाठी जिल्हा क्रिडा संकुल भंडारा येथे किंवा जिल्हयातील एका शाळेत जाऊन शालेय विद्यार्थ्यांसोबत फुटबॉल खेळून महाराष्ट्र मिशन फुटबॉल मिशन १ मिलियन यशस्वी करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी केले आहे.

Web Title: Football today to play in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.