शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

समस्या सोडवा, अन्यथा आंदोलन

By admin | Updated: September 25, 2016 00:48 IST

वारंवार चर्चा, निवेदने, आंदोलने करूनही प्राथमिक, माध्यमिक शिक्षकांच्या समस्या सुटलेल्या नाहीत.

सीईओंना निवेदन : शिक्षक संघटना सरसावल्याभंडारा : वारंवार चर्चा, निवेदने, आंदोलने करूनही प्राथमिक, माध्यमिक शिक्षकांच्या समस्या सुटलेल्या नाहीत. यापुढे शिक्षक अन्याय खपवून घेणार नाही, असा चंग बांधून जिल्हा परिषद अंतर्गत, प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक संघटना सरसावल्या आहे. शिक्षकांच्या समस्या सोडविण्यासाठी यासर्व संघटनांनी शिक्षककृती समिती गठित करून समस्यांचे निवेदन मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांना दिले आहे. भंडारा जिल्हा अंतर्गत अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघ, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ, भंडारा जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षक व कर्मचारी संघटना, जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षक संघ, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती, महाराष्ट्र राज्य पुरोगामी प्राथमिक शिक्षक समिती संघटना व महाराष्ट्र राज्य पदवीधर प्राथमिक शिक्षक महासंघ यांना मिळवून शिक्षक कृती समिती जिल्हास्तरावर गठित करण्यात आली आहे. यात सर्व जिल्हा संघटनांचे जिल्हाध्यक्ष व अन्य पदाधिकाऱ्यांचा समावेश करून शिक्षकांच्या व केंद्र प्रमुखांच्या प्रलंबित मागण्या निकाली काढण्या संदर्भाने पुढाकार घेण्यात आला आहे. यात समितीने एकमताने निर्णय घेत शेतकऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांवर निराकरण न झाल्यास आंदोलन करण्याचे ठरविले आहे. यात ५ आॅक्टोंबरपर्यंत प्रकरणे निकाली निघाल्यास ६ आॅक्टोंबरपासून कामबंद आंदोलन, धरणे, साखळी उपोषण, आमरण उपोषण करण्यात येणार आहे. उपशिक्षणाधिकारी सुवर्णलता घोडेस्वार व कर्मचाऱ्यांना त्यांच्या स्थानांतरण ठिकाणी रूजू होण्याकरीता कार्यमुक्त करण्यात यावे, शालार्थ वेतनातील अनियमिततेची एप्रिल २०१४ पासून चौकशी करावी, आदी मागण्यांचा समावेश आहे.आजच्या सभेत रमेश सिंगनजुडे, ओमप्रकाश गायधने, मुबारक सैयद, धनंजय बिरणवार, ईश्वर नाकाडे, ईश्वर ढेंगे, युवराज वंजारी, प्रमोद घमे, मुकूंद ठवकर, सुधीर वाघमारे, संदीप वहिले, हरिकिशन अंबादे, नेपाल तुरकर, सुधाकर ब्राम्हणकर आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)