पहिल्याच पावसात झाली पवनी महामार्गाची पोलखोल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2020 05:01 IST2020-06-14T05:00:00+5:302020-06-14T05:01:04+5:30
अड्याळ ते नेरला महामार्गावर दोन्ही बाजूला माती घातली. मात्र प्रवाशांना त्रास होणार नाही असा दुसरा मार्गसुध्दा तयार करून दिले नाही. शुक्रवारी झालेल्या पावसाने महामार्गावर चिखलच चिखल निर्माण झाला आहे. या मार्गावरुन आवागमन होत असल्याने अनेकांचे वाहन स्लिप होऊन त्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. पर्यायी व्यवस्था असती वाहन चालकांना त्रास झाला नसता.

पहिल्याच पावसात झाली पवनी महामार्गाची पोलखोल
विशाल रणदिवे।
लोकमत न्यूज नेटवर्क
अड्याळ : भंडारा - पवनी महामार्गाचे बांधकामात मुरुमाऐवजी मोठ्याप्रमाणात माती घालण्यात आल्याची अनेक दिवसांपासून ओरड होती. शुक्रवारी झालेल्या पहिल्याच पावसाने महामार्गावर माती की मुरूम घातला आहे, याची अखेर पोलखोल झाली आहे.
सध्या अड्याळ ते नेरलाच्या पुढे ठीकठिकाणी महामार्गाचे बांधकाम संथपणे सुरू आहे. त्यातही कंत्राटदार यांचा मनमर्जी कारभार असल्याचे स्पष्ट दिसत आहे. अड्याळ ते नेरला महामार्गावर दोन्ही बाजूला माती घातली. मात्र प्रवाशांना त्रास होणार नाही असा दुसरा मार्गसुध्दा तयार करून दिले नाही. शुक्रवारी झालेल्या पावसाने महामार्गावर चिखलच चिखल निर्माण झाला आहे. या मार्गावरुन आवागमन होत असल्याने अनेकांचे वाहन स्लिप होऊन त्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. पर्यायी व्यवस्था असती वाहन चालकांना त्रास झाला नसता. रात्री अपरात्री एखाद्या रुग्ण किंवा अतिआवश्यक कामाकरिता तात्काळ या मार्गावरून प्रवास करणे म्हणजे स्वत:च्या पायावर स्वत:च कुºहाड मारण्यासारखी स्थिती आहे. यावर तात्काळ उपाय म्हणून जिल्हा प्रशासन वा संबंधित विभाग किंवा कंत्राटदार यांनी लक्ष घालून त्वरित उपाययोजना करण्याची मागणी अड्याळ, नेरला येथील ग्रामस्थांसह, वाहन चालक, तसेच प्रवाशांनी केली आहे.
कित्येकांच्या चारचाकी चिखलात फसल्या गेली. शेकडो दुचाकी वाहन धारकांना गाडी ढकलत ढकलत आणावी लागली. महामार्गावर माती असल्याने एकतर घसरण तर दुसरीकडे दोन्ही चाकात मातीच माती जात असल्याने वाहन पुढे जात नाही. त्यामुळे बरेचशे दुचाकी वाहन धारक वाहन पायदळ आणण्यासाठी व अपघात टाळतांना दिसत होते. महामार्गाचे बांधकाम प्रवाशांच्या सुविधांसाठी करीत असले तरी ते काम करताना प्रवाशांना, ग्रामस्थांना, वाहन धारकानाही त्रास होणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे.