घरपोच योजनेचा पहिलाच प्रयोग फोल ठरला

By Admin | Updated: December 11, 2015 01:10 IST2015-12-11T01:10:00+5:302015-12-11T01:10:00+5:30

अन्न धान्य वितरण प्रणातील पारदर्शकता यावी म्हणून शासनाने द्वारपोच योजना जिल्ह्यात कार्यान्वित केली. पहिला प्रयोग डिसेंबर महिन्यापासून सुरू केला.

The first experiment of the home-based scheme was a failure | घरपोच योजनेचा पहिलाच प्रयोग फोल ठरला

घरपोच योजनेचा पहिलाच प्रयोग फोल ठरला

लाभार्थी संकटात : शासकीय गोदामातील हमालांनी पुकारला संप, हमालीचा प्रश्न ऐरणीवर
राहुल भुतांगे तुमसर
अन्न धान्य वितरण प्रणातील पारदर्शकता यावी म्हणून शासनाने द्वारपोच योजना जिल्ह्यात कार्यान्वित केली. पहिला प्रयोग डिसेंबर महिन्यापासून सुरू केला. परिणामी राशन दुकानदारांनी हमाल कामगारांना हमाली देणे पुर्णत: बंद केले. तुटपुंजी हमाली शासनाकडून मिळत आहे. त्यामुळे हमालांवर संकट ओढावले आहे.
महागाईच्या काळात ते न परवडण्यासारखे आहे. त्यामुळे एकतर शासनाने हमाली वाढवून द्यावी किंवा रास्तभाव दुकानदाराकडून हमाली मिळावी, याकरिता तुमसर मोहाडी तालुक्यातील तिन गोदामातील हमाल कामगारांनी ८ डिसेंबरपासून काम बंद आंदोलन पुकारला आहे. अजुनपर्यंत ग्रामीण भागात राशनचे धान्य दुकानदाराकडे पोहचले नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील लाभार्थ्यांना राशनाअभावी उपासमारीचे संकट ओढावले आहे. त्यामुळे शासनाची घरपोच योजना फोल ठरल्याचे चित्र आहे.
महाराष्ट्र शासनाने नुकतेच नवीन शासन निर्णय काढून अन्न धान्य व जीवनावश्यक वितरण प्रणालीत पारदर्शकता यावी व भ्रष्टाचाराला आळा घालता यावा म्हणून द्वारपोच योजना अंमलात आणली.वाहतूक भत्ता व हमालीचा खर्चाची रिबेट कपात करून दुकानदारांना गोदामपर्यंत न येता धान्याची चालान भरल्यानंतर वाहतूक करणाऱ्या वाहन कंत्राटदाराकडून शासकीय गोदामातून धान्य वाहनात लादून तो धान्य राशन दुकानदाराच्या दुकानापर्यंत पोहचवू देण्याची जबाबदारी कंत्राटदाराकडे सोपविण्यात आली आहे. या योजनेचा पहिलाच प्रयोग डिसेंबर महिन्यापासून सुरू झाला. काही दिवस हमालांनी कंत्राटदारांच्या वाहनात धान्य चढविले. परंतु त्यांना हमाली मिळालीच नाही. त्यांना हमाली कोण देणार हा प्रश्न पडला तेव्हा गोदाम व्यवस्थापकाला विचारणा करण्यात आली. आता दुकानदार हमाली देणार नाही असे सांगितल्याने हमाल बांधवाची फसगत झाल्याचे समजताच हमालांनी तुमसर मोहाडी तालुक्यातील तुमसर, वरठी व मोहाडी येथील शासकीय गोदामातील हमालाशी संपर्क साधून या योजने अंतर्गत धान्य ट्रकमध्ये चढविण्याची हमाली मिळणार नसल्याने तिन्ही गोदामातील हमाल कामगारांनी काम बंद आंदोलन पुकारून धान्याचे वाहन भरण्यास नकार दिला. तुमसर येथील शासकीय गोदामाअंतर्गत येत असलेल्या १५७ रास्तभाव दुकानांपैकी केवळ २७ दुकानदारांना धान्य पोहचते झाले. मोहाडी खापा येथील गोदामाअंतर्गत ५९ रास्त भाव दुकानांपैकी केवळ १७ दुकानदारांना व वरठी येथील शासकीय गोदामा अंतर्गत ५३ दुकानदारांपैकी १५ दुकानदारांना आतापर्यंत राशन मिळाले आहे. एकीकडे शासन महिन्याच्या एक ते तीन तारखेपर्यंत सर्व धान्य पोहचते करून लाभार्थ्यांना ५ ते ६ तारखेपर्यंत धान्य वितरित करण्याचे फर्मान दिले आहे. परंतु अजूनपर्यंत ग्रामीण भागातील नागरिकांना राशन मिळाले नाही.त्यामुळे गावकऱ्यांची ओरड आहे. ही समस्या लक्षात घेता तहसिलदार टी.डी. सोनवाने, पुरवठा निरीक्षक सुनिल लोहारे, मोहाडीचे नायब तहसलिदार वाय.एम. गणवीर, वाटप गोदाम व्यवस्थापक वाय.ई. मेश्राम, मोहाडीचे प्रमोद बोरकर, वरठीचे संजु उके व स्वस्त धान्य दुकानदार संघाचे जिल्हा अध्यक्ष अरविंद कारेमोरे यांनी तुमसर येथील धान्य गोदामात सुरू असलेल्या हमालांच्या आंदोलनस्थळी भेट देवून त्यांच्या समस्या जाणून घेतली.

कंत्राटदाराकडून हमालांची पिळवूणक
भंडारा जिल्ह्यात गणेश कामगार हमाल सोसायटीतील जिल्ह्यातील नऊ शासकीय गोदामातील हमाल पुरविण्याचे कंत्राट शासनामार्फत दिले आहे. या सोसायटीचे चालक मालक हे भंडारा येथील कमलकुमार लाहोटी हे आहेत. यांना शासनातर्फे हमालाकरिता २२.८० रूपये इतकी हमाली प्रती क्विंटल प्रमाणे मिळते. परंतु हे कंत्राटदार हमालांना ९.३० रूपयेच देते. त्यातही १२ टक्के जीपीएफ कपात आहे. यापूर्वी रेशन दुकानदाराकडून चार रूपये प्रती क्विंटल प्रमाणे धान्य वाहणात चढविण्याची हमाली मिळत होती. त्यामुळे हमालांना परवडत होते. परंतु आता या योजनेच्या माध्यमातून ते चार रूपये हमालीही मिळणे बंद झाले आहे. त्यामुळे हे काम बंद आंदोलन हमाल कामगारांनी केले असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली.

Web Title: The first experiment of the home-based scheme was a failure

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.