पालोरा शाळेचा पहिला दिवस उत्साहात
By Admin | Updated: June 28, 2014 01:01 IST2014-06-28T01:01:48+5:302014-06-28T01:01:48+5:30
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पालोरा येथे पहिला दिवस उत्साहात साजरा केला गेला. वर्ग १ ते ४ मधील मुलांच्या पालकांना

पालोरा शाळेचा पहिला दिवस उत्साहात
करडी (पालोरा) : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पालोरा येथे पहिला दिवस उत्साहात साजरा केला गेला. वर्ग १ ते ४ मधील मुलांच्या पालकांना शाळेत येण्यासाठी घरी जावून निमंत्रण दिले गेले. शाळेत पोहचलेल्या मुलांचे पुष्पगुच्द व चॉकलेट देवून मान्यवरांचे हस्ते स्वागत केले गेले. पहिल्या वर्गातील नवगंताचे मनोबल वाढावे, शाळेत रोज येण्यासाठी आवड निर्माण यासाठी वातावरण निर्मिती केली गेली.
पालोरा येथील प्राथमिक शाळेत पहिल्या दिवसीच्या उत्साहाप्रसंगीच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष उज्वला मोटघरे तर प्रमुख अतिथी म्हणून शाळा समितीचे उपाध्यक्ष भोजराम तिजारे, युवराज गोमासे, शाळा समिती सदस्या मनिषा बुरडे, माया खराबे, कविता मोटघरे, मुख्याध्यापक चाचेरे, सहायक शिक्षक चंद्रकांत केसाळे, रमेश पवनकर, लता तिडके, पालक व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.
सर्वप्रथम मान्यवरांचे हस्ते छत्रपती शाहू महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण केले गेले. यावेळी मुख्याध्यापक चाचेरे, युवराज गोमासे, उज्वला मोटघरे यांनी शाहू महाराजांच्या जीवन कार्यावर प्रकाशझोत टाकला. त्यांच्या कार्याची आठवण मुलांना करून देण्यात आली. शासनाच्या वतीने पुस्तक दिन म्हणून २६ जून हा दिवस हा साजरा केला जाते.
विद्यार्थ्यांच्या जीवनात पुस्तकांचे महत्व किती थोर आहेत. पुस्तकांना गुरू का म्हटले जाते यावरही मार्गदर्शन केले गेले. उपस्थित मान्यवरांचे हस्ते सर्व विद्यार्थ्यांना शालेय पुस्तकाचे वाटप केले गेले. गणवेशाचे वाटपही पूर्ण केले गेले.
प्रस्तावना व संचालन मुख्याध्यापक चाचेरे यांनी केले तर आभार शिक्षक रमेश पवनकर यांनी केले. विद्यार्थ्यांना गोड जेवण देण्यात आले. जि.प. हायस्कूल पालोरा येथेही नवागतांचे स्वागत केले गेले. सर्व विद्यार्थ्यांना कार्यक्रमाला उपस्थित मान्यवरांचे हस्ते पाठ्यपुस्तके व शालेय गणवेशाचे वाटप केले गेले. यावेळी गावातील प्रतिष्ठीत नागरिक, मुख्याध्यापक सर्व शिक्षक, शाळा समिती सदस्य व विद्यार्थी उपस्थित होते. (वार्ताहर)