Corona Virus in Bhandara; भंडारा जिल्ह्यात आढळला पहिला कोरोना रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2020 15:13 IST2020-04-27T15:12:30+5:302020-04-27T15:13:59+5:30
लॉकडाऊन घोषित झाल्याच्या ३५ दिवसानंतर भंडारा जिल्ह्यात सोमवारी कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला.

Corona Virus in Bhandara; भंडारा जिल्ह्यात आढळला पहिला कोरोना रुग्ण
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : लॉकडाऊन घोषित झाल्याच्या ३५ दिवसानंतर भंडारा जिल्ह्यात सोमवारी कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला. भंडारा तालुक्यातील एका गावातील ४५ वर्षीय महिलेच्या घश्यातील स्वॅबचा नमूना पॉझिटिव्ह आला. सदर गावाच्या तीन किलोमीटरचा परिसर बफर झोन म्हणून घोषीत करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी एम.जे. प्रदीपचंद्रन यांनी दिली.
सदर महिला ही क्षयरोगाची रुग्ण असून तिच्यावर भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू होते. १५ एप्रिल रोजी ती या आजारामुळे उपचारार्थ रुग्णालयात आली होती. श्वास घेण्यास त्रास होत असल्याने तिला तीव्र श्वसनदाह अंतर्गत दाखल करण्यात आले. दरम्यान तिच्यात कोरोना संसर्गित लक्षणे आढळल्याने तिला २३ एप्रिल रोजी आयसोलेशन वॉर्डात हलविण्यात आले.