शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी..."; राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यावर शरद पवारांचे स्पष्ट मत
2
पुन्हा तेच! एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड; अहमदाबादहून लंडनला जाणारे विमान रद्द
3
डोनाल्ड ट्रम्प यांनी आणला स्वत:च्याच ब्रँडचा स्मार्टफोन; अमेरिकेत भूकंप, कमी किंमतीत एवढे फिचर्स देणार की...
4
भारताला अंदमानात २ लाख कोटी लिटर कच्च्या तेलाचं भांडार मिळालं, GDP २० ट्रिलियन डॉलर्सवर जाणार?
5
इस्रायल-इराण यांचे एकमेकांवर बॉम्ब; सरकारी न्यूज चॅनेलच्या इमारतीवर हल्ले
6
ऑल टाईम हायवरुन सोन्याचे दर घसरले, चांदीच्या दरात मात्र तेजी; पाहा लेटेस्ट किंमत
7
'या सगळ्यांना मुंबई बॉम्ब स्फोटातील आरोपी करायला हवे', खासदार संजय राऊत नितेश राणेंवर भडकले
8
Census of India: ३५ लाख कर्मचारी करणार जनगणना, नागरिकांनाही करता येणार स्वयंनोंदणी!
9
अरेरे! लग्नानंतर बॉयफ्रेंडसोबत पळून गेली बायको; नवरा म्हणतो, "राजा रघुवंशी होण्यापासून वाचलो"
10
सेलिब्रिटी जोडप्याने फिल्ममेकरचं केले अपहरण, गुन्हा दाखल; रस्त्यात एकट्याला अडवले, मग...
11
'समृद्धी'वर दगडफेक करून लुटीचा प्रयत्न; छ. संभाजीनगर ते नागपूर मार्गावरील प्रकार वाढले!
12
Tata Motors Shares: परदेशातून चांगली बातमी, तरीही आपटले टाटा मोटर्सचे शेअर्स; गुतवणूकदारांनी काय करावं?
13
४८ तासानंतरही केरळमध्ये उभं आहे जगातील सर्वात महागडं लढाऊ विमान; नेमकं कारण काय?
14
गुरुवारी गुरुपौर्णिमा: ४ गुरुवार करा स्वामी सेवा, कृपा होईलच विश्वास ठेवा; नेमके काय करावे?
15
घाईगडबडीत चुकीची कर व्यवस्था निवडली? घाबरू नका! ITR दाखल करताना 'ही' ट्रिक वापरा आणि टॅक्स वाचवा
16
इस्राइलने इराणचा आणखी एक बडा मोहरा टिपला, चीफ ऑफ आर्मी स्टाफ अली शादमानी यांना मारल्याचा दावा  
17
डॉली चायवाला Starbucks चा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर बनणार का? समोर आलं सत्य, कंपनी म्हणाली...
18
हुल्लडबाजांच्या दुचाकी पुलावर आल्याने गर्दी झाली अन् होत्याचे नव्हते झाले!
19
विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, इंडिगोने नागपुरमध्ये आपत्कालीन लँडिंग केले
20
बुधादित्य त्रिग्रही धनयोग: ५ राशींना लक्ष्मी कृपेने भरभराट, भरघोस शुभ-लाभ; भाग्योदयाचा काळ!

लाखनीत फटाका सेंटरला आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2020 05:00 IST

बाजार चौकात अजय सावरकर यांचे अंबिका जनरल स्टोर्स व फटाका सेंटर आहे. दिवाळीनिमित्त या दुकानात मोठ्या प्रमाणात फटाके विक्रीसाठी ठेवले होते. तसेच जनरल स्टोर्सचे साहित्यही होते. सोमवारी रात्री दुकान नेहमीप्रमाणे बंद करण्यात आले. मात्र मध्यरात्रीच्या सुमारास अचानक फटाक्यांच्या आवाज ऐवू लागला. नागरिकांनी धाव घेतली असता. फटाक्याच्या दुकानाला आग लागल्याचे दिसून आले. फटाक्यांचे बार उडत असल्याने आगीवर नियंत्रण मिळविणे कठीण जात होते.

ठळक मुद्दे११ लाखांचे नुकसान : फुलभंडार व कापड दुकानही जळाले

लोकमत न्यूज नेटवर्कलाखनी : शहरातील राष्ट्रीय महार्गावरील बाजार चौकात असलेल्या एका फटाक्याच्या दुकानाला मध्यरात्रीच्या सुमारास आग लागली. या आगीत फटाका दुकानासह लगतचे कापड व फुलभंडार भस्मसात झाले. तब्बल अकरा लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. आग लागली तेव्हा शहर फटाक्यांच्या आवाजाने दणाणून गेले होते. नागरिकांनी समयसुचकतेने या आगीवर नियंत्रण मिळविले.बाजार चौकात अजय सावरकर यांचे अंबिका जनरल स्टोर्स व फटाका सेंटर आहे. दिवाळीनिमित्त या दुकानात मोठ्या प्रमाणात फटाके विक्रीसाठी ठेवले होते. तसेच जनरल स्टोर्सचे साहित्यही होते. सोमवारी रात्री दुकान नेहमीप्रमाणे बंद करण्यात आले. मात्र मध्यरात्रीच्या सुमारास अचानक फटाक्यांच्या आवाज ऐवू लागला. नागरिकांनी धाव घेतली असता. फटाक्याच्या दुकानाला आग लागल्याचे दिसून आले. फटाक्यांचे बार उडत असल्याने आगीवर नियंत्रण मिळविणे कठीण जात होते. मात्र नागरिकांनी तात्काळ राष्ट्रीय महामार्गाचे उड्डाणपुलाचे बांधकाम करणाऱ्या पाणी टँकरला पाचारण केले. त्यामुळे आगीवर नियंत्रण मिळविता आले. मात्र या आगीत लगतचे नागराज फुलभंडार आणि लक्ष्मी क्लॉथ स्टोर्स जळाले.अंबिका फटाका सेंटरचे दोन लाख रुपयांचे नुकसान झाले. तर नागराज फुलभंडारा व जनरल साहित्य मधील तब्बल सात लाखांचे साहित्य जळाले. या दुकानात कागदी पत्रवाळ्यासह सणासुदीसाठी लागणारे मोठे साहित्य ठेवण्यात आले होते. तर लक्ष्मी क्लॉथ स्टोर्सचे दोन लाख रुपयांचे नुकसान झाले. भंडारा नगरपरिषदेच्या अग्नीशमन दलालाही पाचारण करण्यात आले.शॉर्टसर्किटने आगीचा अंदाजफटाका सेंटरला लागलेली आग शॉर्ट सर्किटने लागल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या या दुकानाला आग लागली तेव्हा परिसरातील नागरिकांची प्रचंड गर्दी झाली होती. फटाकाचे आवाजही मोठ्या प्रमाणात येत होते. आग वेळीच आटोक्यात आल्याने मोठा अनर्थ टळला.

टॅग्स :fire crackerफटाके