Fire at Lakhni in Bhandara district | भंडारा जिल्ह्यातील लाखनी येथे फटक्याच्या दुकानाला आग

भंडारा जिल्ह्यातील लाखनी येथे फटक्याच्या दुकानाला आग

ठळक मुद्देकापड व फुलाचे दुकानही भस्मसात, ११ लाखांचे नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : लाखनी येथील एका फटाक्याच्या दुकानाला आग लागल्याची घटना मध्यरात्रीच्या सुमारास घडली. या आगीत फटका दुकानासह लगतचे कापड व फुलाचे दुकानही भस्मसात झाले. यात ११ लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.

लाखनी येथे सिंधी लाईनमध्ये अंबिका फटका सेंटर आहे. दिवाळी निमित्त या दुकानात फटकाने मोठ्यप्रमाणात ठेवले होते. सोमवारी रात्री दुकान नेहमीप्रमाणे बंद करण्यात आले. मात्र मध्यरात्रीच्या सुमारास अचानक फटक्यांचा आवाज येवू लागला. नागिकांनी धाव घेतली असता फटाक्याच्या दुकानाला आग लागल्याचे दिसून आले. नागरिकांनी तात्काळ एका बांधकाम कंपनीचे पाण्याचे टँकर आणून आग विझविली. मात्र तोपर्यंत दुकान जळून खाक झाले होते. यात २ लाखांचे नुकसान झाले, तर लगतचे नागराज कोठेकर यांचे फुलांचे दुकान आगीच्या भक्ष्यस्थानी सापडले, त्यात त्यांचे ७ लाखांचे तर लक्ष्मी कापड दुकानाचे दोन लाखाचे असे एकूण ११ लाखांचे नुकसान झाले.

Web Title: Fire at Lakhni in Bhandara district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.