शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

अखेर 'त्या' तिन्ही गावांचा निवडणुकीवरील बहिष्कार मागे

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2024 14:00 IST

Bhandara : २ ऑक्टोबरचा अल्टिमेटम ठरला फायद्याचा

मुखरू बागडे पालांदूर : लाखनी तालुक्यातील देवरी, लोकमत न्यूज नेटवर्क सायगाव व सानगाव येथील नागरिकांना जीवनावश्यक सोयी सवलती मिळत नसल्याने लोकप्रतिनिधी व प्रशासनाला विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निवेदनातून इशारा देण्यात आला होता. २ ऑक्टोबरचा अल्टिमेटम देण्यात आला होता. मात्र २७ सप्टेंबरला उपविभागीय अधिकारी अश्विनी मांजे यांच्या अध्यक्षतेखाली साकोली येथे सकारात्मक बैठक पार पडली. सर्वच समस्यांना अधिकाऱ्यांनी होकार दिला. त्यामुळे गावकऱ्यांच्या वतीने विधानसभेवरील बहिष्कार सर्वानुमते मागे घेण्यात आला. 

सायगाव ते किटाडी रस्त्याचे खडीकरण मंजूर करण्यात आले. वाकल ते देवरी रस्त्याचे प्रकरण मंजूर प्रक्रियेत आहे. देवरी-गोंदी- सायगाव रस्ता मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून मंजूर आहे. विधानसभा निवडणुकीनंतर त्यावर बांधकाम नियोजित असल्याचे अभियंता दीनदयाल मटाले उपविभागीय बांधकाम अधिकारी साकोली यांनी ग्वाही दिली. 

इंदिरा गांधी गोसेखुर्द प्रकल्पाअंतर्गत तिन्ही गावांना सिंचनातून वगळल्याची माहिती सरपंचांनी दिली. त्यावर अध्यक्ष महोदयांनी संबंधित यंत्रणेला पत्र देत कमांड एरियामध्ये समाविष्ट करण्याचे सुचविले. 

तिन्ही गावात बस सुविधा नाही. त्यावर वाहतूक नियंत्रक एकनाथ शहारे आगार साकोली यांनी रस्ते दुरुस्त होताच बस सुरू करण्याचा शब्द दिला. तिन्ही गावांतील अतिक्रमणधारकांना पट्टे मिळण्याकरिता ग्रामसेवक यांना सूचना दिली. सानगाव येथे स्मशानभूमीची जागा गट क्रमांक ९३ मध्ये उपलब्ध करून देण्याचा शब्द तहसीलदार दत्तात्रय निंबाळकर यांनी दिला. 

तिन्ही गावच्या मूलभूत समस्या निवडणुकापूर्वीच सोडविण्याचा आधार मिळाल्याने गावकऱ्यांनी एकमताने बहिष्कार मागे घेतला. उपविभागीय अधिकारी अश्विनी मांजे, तहसीलदार दत्तात्रय निंबाळकर, अभियंता दीनदयाल मटाले, शाखा अभियंता एस. एस. शेख, विस्तार अधिकारी के. डी. टेंभरे, ग्रामसेवक एम. एम. रामटेके, तलाठी रिना वालमंडाले, पोलिस उपनिरीक्षक नखाते, वाहतूक नियंत्रक एकनाथ शहारे, सरपंच उपेंद्र शेंडे, उपसरपंच रमेश खांडेकर, तमुंस अध्यक्ष प्रभू शेंडे, अनिल शिंदे, गणेश मारवाडे, गौरी मेश्राम, लक्ष्मी शंकर मेश्राम, इंदुताई दशरथ मेश्राम, अर्चना सुरेश त्रिपाठी, सचिन आगरकर उपस्थित होते. 

टॅग्स :vidhan sabhaविधानसभाElectionनिवडणूक 2024bhandara-acभंडारा