शहरं
Join us  
Trending Stories
1
"हरलेल्यांनी अटी घालायच्या नसतात..."; ट्रम्पचा शस्त्रसंधी वाढवण्याचा निर्णय इराणने धुडकावला
2
India-China Big Tension: इराण युद्ध… कच्च्या तेलानं बिघडवला खेळ; भारत-चीनला झटका, आली 'ही' वाईट बातमी
3
Government Employees Strike: मंत्रालयातील निम्मे कर्मचारी संपावर, कामकाजावर मोठा परिणाम
4
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
5
मुंबई फिरायला आलेली चिमुरडी गर्दीत हरवली, पोलिसांनी झटपट पावले उचलली; पालकांकडे सुखरूप सोपवले
6
गुरुपुष्यामृत २०२६: स्वामी-लक्ष्मी-शनि दोन्ही हातांनी भरघोस देतील, ३ गोष्टी करा; पुण्य-लाभ!
7
Mumbai University: Mumbai University: मुंबई विद्यापीठाच्या टी.वाय. बी.कॉम.च्या तीन विषयांच्या प्रश्नपत्रिका फुटल्या
8
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
9
Unseasonal Rain: राज्यात शुक्रवारपर्यंत वादळी वारे, गारपीट अन् पावसाची शक्यता, नागरिकांसाठी सूचना
10
आयटी कंपन्यांमधील कामगार हिताच्या उपाय योजनांकरिता अभ्यास गट गठीत करा, कामगार मंत्र्यांचे आदेश  
11
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
12
Donald Trump: "करार करा, अन्यथा बॉम्ब टाकू" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला अखेरचा इशारा
13
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
14
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
15
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
16
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
17
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
18
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
19
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
20
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
Daily Top 2Weekly Top 5

अखेर ‘तिने’ आयुष्याचा गाठला अंत

By admin | Updated: February 22, 2016 01:03 IST

कित्येक दिवसांपासून भूकेने व्याकुळे जीवाला सरपटत नेणाऱ्या वृध्देला आधार मिळाला. पुरेशे अन्न, वस्त्र देतांना संबंधित आधारकांनी तिला रुग्णालयात दाखल केले.

अन्नावाचून मृत्यू : युवकाने स्वीकारले पालकत्वलाखांदूर : कित्येक दिवसांपासून भूकेने व्याकुळे जीवाला सरपटत नेणाऱ्या वृध्देला आधार मिळाला. पुरेशे अन्न, वस्त्र देतांना संबंधित आधारकांनी तिला रुग्णालयात दाखल केले. मात्र तब्बल २२ दिवस उपचारार्थ दाखल या महिलेचा वार्धक्याने त्रस्त शरीराने दगा दिला अन् तिने आयुष्याचा अंत गाठला. शारदा बहू शहारे (८०) असे या वृध्देचे नाव. अन्नवाचून वार्धक्याने ग्रस्त जीव पेलवितांना या वृध्देकडून अनेकांना अन्नासाठी हाक दिली जात होती. लाखांदूर येथील टी-पाईन्ट या वर्दळीच्या मुख्य चौकात उघड््यावर सरपटत संचार करतांना अनेकांकडून कधी मतीमंद, मनोरुग्ण तर कधी वेंधळेपणाने व्यंगत्वपूर्ण जीणे पाहून घृणास्पद वागणुक दिल्या गेले.सामाजिक व मानवी संवदेना जागृत होण्याहेतूचे वृत्त प्रकाशित होताच सामाजिक दायित्वाच्या भावनेने ओभंबलेल्या येथील युवा शेतकऱ्यांनी तिचे पालकत्व स्विकारले. अनेक दिव्यांपासून उघड्यावर संचार करतांनाच अन्नावाचून शरिराला आलेल्या व्यंगत्वाची दखल घेत पुरेसे अन्न व नवीन वस्त्र देवून थकलेल्या या जीवाला ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू होते. वयाची ८० वर्षे गाठलेल्या या वार्धक्यपूर्ण जीवाला आयुष्याच्या अंताकडे वाटचाल करतांना युवा शेतकऱ्यांच्या रुपात आधारवड मिळाला. मात्र कित्येक दिवसांपासून अन्नावाचून थकलेल्या शरीरिला पुरेसे अन्न-वस्त्र मिळूनही वार्धक्याने ग्रस्त या वृध्देने २० फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७ वाजता दरम्यान जीव सोडला. मृत्यूची बातमी कळताच संबंध युवा शेतकऱ्यांनी ग्रामीण रुग्णालय गाठले. यावेळी संबंधितांनी वैद्यकिय अधिकाऱ्यांच्या संमतीनुसार सामाजिक रितीरिवाजानुसार २१ फेब्रुवारी रोजी अंत्यसंस्कार केले. पुरेसे अन्न, वस्त्र व औषधोपचार होवूनही वार्धक्याने ग्रस्त व्यंगत्वाने सरपटणाऱ्या या जीवाने अखेर आयुष्याचा अंत गाठला. (तालुका प्रतिनिधी)