अखेर राजेंद्र पटलेंचा शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2018 23:09 IST2018-05-15T23:08:54+5:302018-05-15T23:09:09+5:30
भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीची शिवसेनेने उमेदवारी नाकारल्यामुळे स्वपक्षावर नाराज असलेले शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजेंद्र पटले यांनी शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ करीत आज मंगळवारला शिवसेना पक्ष सदस्यत्व आणि जिल्हाप्रमुखपदाचा राजीनामा देऊन भाजपात प्रवेश केला.

अखेर राजेंद्र पटलेंचा शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीची शिवसेनेने उमेदवारी नाकारल्यामुळे स्वपक्षावर नाराज असलेले शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजेंद्र पटले यांनी शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ करीत आज मंगळवारला शिवसेना पक्ष सदस्यत्व आणि जिल्हाप्रमुखपदाचा राजीनामा देऊन भाजपात प्रवेश केला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत नागपूर येथील ‘रामगिरी’ या शासकीय निवास्थानी प्रवेश केला. यावेळी भाजपचे विदर्भ संघटक डॉ.उपेंद्र कोठेकर, विधान परिषद सदस्य डॉ.परिणय फुके उपस्थित होते. पटले यांनी भाजपात प्रवेश केल्याची चर्चा रविवारपासून होती. परंतु तेव्हापासून ते कुणाच्याही संपर्कात नव्हते. भ्रमणध्वनीवरही प्रतिसाद देत नव्हते. त्यामुळे त्यांच्या प्रवेशाबद्दल ठामपणे सांगता येत नव्हते. दरम्यान, मंगळवारला त्यांनी भाजपात प्रवेश केल्यामुळे चर्चांना पुर्णविराम मिळाला आहे. या लोकसभा पोटनिवडणुकीत आपल्याला उमेदवारी मिळावी, यासाठी राजेंद्र पटले हे ईच्छूक होते. परंतु शिवसेनेने उमेदवारी न दिल्यामुळे नाराज पटलेंनी भाजपात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नागपुरात घेतलेल्या बैठकीलाही ते उपस्थित नव्हते.