अखेर रुग्णालयात मिळाली नवीन व्हीलचेअर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:39 IST2021-08-24T04:39:44+5:302021-08-24T04:39:44+5:30
शासन अनेक प्रकारच्या योजनेवर लाखो रुपये खर्च करते; परंतु आरोग्याशी संबंधित उपकरणावर खर्च करण्यास त्यांच्याकडे निधी नाही. जर माणूस ...

अखेर रुग्णालयात मिळाली नवीन व्हीलचेअर
शासन अनेक प्रकारच्या योजनेवर लाखो रुपये खर्च करते; परंतु आरोग्याशी संबंधित उपकरणावर खर्च करण्यास त्यांच्याकडे निधी नाही. जर माणूस जगेल तरच तो दुसऱ्या योजनेचा लाभ घेऊ शकेल ना? मात्र हे सांगावे तरी कोणाला, असा प्रश्न आहे. मोहाडी येथे ग्रामीण रुग्णालय आहे; परंतु त्याची अवस्था प्राथमिक आरोग्य केंद्रासारखी आहे. कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया सोडली तर इतर कोणतीच शस्त्रक्रिया येथे केली जात नाही, ईसीजी काढण्याचीही सुविधा नाही, एक्स-रे मशीन आहे; पण हाडांचे डाॅक्टर नाही, इथे पुरुषांचा एक व गर्भवती महिलांचा एक असे दोन वाॅर्ड आहेत; परंतु या दोन वाॅर्डासाठी आता एकच परिचारिका कार्यरत असते. पूर्वी दोन परिचारिका असायच्या. तालुक्यातील जवळपास ३० ते ३५ गावांतील रुग्ण या रुग्णालयात मोठ्या आशेने येतात. मात्र त्यांना त्यांच्या आशानुरूप सेवा मिळत नाही. येथील दुरव्यवस्थेकडे आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व जनप्रतिनिधींनी लक्ष घालून उत्तम आरोग्य सेवा उपलब्ध करून द्याव्या, अशी मागणी सिराज शेख, नरेंद्र निमकर, अफरोज पठाण, यशवंत थोटे, गिरिधर मोटघरे, सुनील मेश्राम, नईम कुरेशी, जिब्राईल शेख, बबलू सय्यद, पुरुषोत्तम पात्रे, खुशाल कोसरे, मुंतू पठाण आदी नागरिकांनी केली आहे.