शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

अखेर अधिकाऱ्यांनी पुरविल्या खेळाडूंना सुविधा

By admin | Updated: September 17, 2014 23:35 IST

जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुलात शालेय क्रीडा स्पर्धा सुरू आहे. यात सुविधांचा अभाव असल्याचे वृत्त आज दि. १७ ला प्रकाशित झाले.

भंडारा : जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुलात शालेय क्रीडा स्पर्धा सुरू आहे. यात सुविधांचा अभाव असल्याचे वृत्त आज दि. १७ ला प्रकाशित झाले. त्यानंतर क्रीडा विभाग खळबळ जागे झाले. जिल्हा क्रीडा अधिकारी सुभाष गांगरेड्डीवार यांनी स्वत: दखल घेऊन क्रीडांगणाची पाहणी करून खेळाच्या ठिकाणी पाणी मारण्याचे आदेश दिले व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली. जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धांचे आयोजन छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुलात मंगळवार व बुधवारी करण्यात आले. स्पर्धेच्या पहिल्या दिवशी १४, १७ व १९ वयोगटातील शालेय मुली व मुलांच्या क्रीडा स्पर्धा पार पडल्या. मात्र पावसाळयाचे दिवस असल्याने जनावरांच्या पायांची खुरे मैदानात स्पष्ट दिसून येत असतानाही तिथे माखण माती न टाकता स्पर्धा घेण्यात आल्या. क्रीडा विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे खेळाडू तिथे पडून त्याला इजा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. व खेळाडूंना शुध्द पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने त्यांना हॉटेलमधून पाण्याची बॉटल विकत घेऊन घ्याव्या लागल्या. या आशयाचे वृत्त आज ‘लोकमत’ मध्ये प्रकाशित झाले होते. यामुळे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाचा कारभार उघडकीस आला होता. त्यामुळे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली. आज दि. १७ ला मुलींचे सामने होते. सामने सुरू होण्यापूर्वी कर्मचाऱ्यांनी मैदानावरील दुरवस्था दुर करण्याचा प्रयत्न केला. कबड्डीच्या मैदानावर असलेले खड्डे बुजविण्यासाठी त्यावर प्रथम पाणी मारण्यात आले व जनावरांची खुरे असलेला भाग दाबण्यात आला. यासोबतच शुध्द पिण्याचे पाणी खेळाडूंना उपलब्ध करून देण्यात आले. (शहर प्रतिनिधी)