शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
2
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
3
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
4
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
5
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
6
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
7
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
8
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
9
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
10
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
11
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
12
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
13
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
14
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
15
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
16
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
17
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
18
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
19
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
20
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत

अखेर ३६ तासानंतर निघाला तोडगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2019 9:43 PM

मंगळवारी सकाळच्या सुमारास ट्रॅक्टरखाली दबून चेतन जवंजार या १५ वर्षीय विद्यार्थ्याचा अपघाती मृत्यू झाला होता. शवविच्छेदनानंतर रात्रीलाच पार्थिवावर अंत्यसंस्कार न करता मृतदेह थेट शुक्राचार्य विद्यालयासमोर ठेवण्यात आला.

ठळक मुद्देशाळेसमोर ठेवला पार्थिव : प्रकरण विद्यार्थ्यांच्या अपघाती मृत्यूचे

लोकमत न्यूज नेटवर्कलाखनी/साकोली : मंगळवारी सकाळच्या सुमारास ट्रॅक्टरखाली दबून चेतन जवंजार या १५ वर्षीय विद्यार्थ्याचा अपघाती मृत्यू झाला होता. शवविच्छेदनानंतर रात्रीलाच पार्थिवावर अंत्यसंस्कार न करता मृतदेह थेट शुक्राचार्य विद्यालयासमोर ठेवण्यात आला. जोपर्यंत तोडगा निघत नाही, तोपर्यंत येथून आम्ही हलणार नाही अशी भूमिका घेण्यात आली. परिणामी तब्बल ३६ तासानंतर संस्थाचालक महादेव गजापुरे यांनी लेखी आश्वासन दिल्याने तोडगा निघाला.मिरेगाव येथील शुक्राचार्य विद्यालयाचे इयत्ता नववीचे चार विद्यार्थी डेक्सबेंच सोडण्याकरिता ट्रॅक्टरने मुंडीपार येथे गेले होते. परत येत असतांना ट्रॅक्टर चालकाने अचानक ब्रेक मारला. यात ट्रॅक्टरचा इंजिनवर बसलेला चेतन हा विद्यार्थी खाली कोसळला. यात ट्रॅक्टरचा चाकाखाली दबून जागीच मृत्यू झाला. घटनेची वाच्यता वाऱ्यासारखी होताच कुटूंबीयासह शेकडो नागरिकांनी घटनास्थळी किटाडीत धाव घेतली. जोपर्यंत मुख्याध्यापकावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत हलणार नाही, असा पवित्रा घेतला. दरम्यान मंगळवारी रात्री आंदोलकांनी नमते घेत मृतदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालय साकोली येथे नेण्यात आले. दरम्यान शवविच्छेदनानंतर चेतनच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले नाही. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. परंतू आर्थिक मदत मिळत नाही. तोपर्यंत अंत्यसंस्कार होणार नाही, अशी भुमिका घेत आंदोलकानी चेतनचा मृतदेह शितपेटीत बुधवारी विद्यालयासमोर ठेवला. सकाळी १० वाजतापासून शाळेसमोर आंदोलक बसले होते. घटनास्थळी परिस्थिती चिघळू नये यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी प्रभाकर तिक्कस, पोलीस निरीक्षक दामदेव मंडलवार, पिंपरेवार, बंडोपंत बन्सोडे, तहसीलदार मल्लीक विराणी घटनास्थळावर उपस्थित होते. दरम्यान रात्री ८ वाजताच्या सुमारास संस्थाध्यक्ष महादेव गजापूरे यांनी मृतकाच्या कुटुंबाला ५ लक्ष रूपये देण्याचे लेखी आश्वासन दिले. यानंतर चेतनचा मृतदेह शाळेसमोरून उचलण्यात आला. चेतनच्या पार्थिवावर गुरूवारला सकाळी ७ वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.संवेदनशिलता हरविलीघटनेला ३६ तासांचा कालावधी लोटूनही याप्रकरणी तोडगा न निघाला नसल्याने चेतनच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होवू शकले नाही. मृत्यूनंतरही चेतनला यातना भोगाव्या लागल्या. विशेष म्हणजे ज्या ठिकाणी अपघात झाला. त्याच मार्गाने शुक्राचार्य विद्यालयाचे मुख्याध्यापक सारंग गजापुरे लाखनी येथे जात होते. घटनेची माहिती माहित असूनही गजापूरे हे घटनास्थळी थांबले नाहीत. परिणामी त्यांच्या विरोधात जनक्षोभ उफाळलाकाळजाचा तुकडा अपघातात अचानक मृत्यूमुखी पडला. जवंजार कुटूंबीयावर दु:खाचे आभाळ कोसळले. अशा स्थितीतही तोडगा काढण्यासाठी प्रचंड वेळ लागत असल्याने शाळा प्रशासन वेळकाढूपणाचे धोरण अवलंबित असल्याचे यावेळी ऐकीवात होते.