गांधी जीवन-विचार परीक्षेत जिल्ह्याची भरारी

By Admin | Updated: February 17, 2016 00:20 IST2016-02-17T00:20:19+5:302016-02-17T00:20:19+5:30

गुजरात विद्यापीठाद्वारे २ आॅक्टोबर २०१५ ला झांकी (वर्ग ५ ते ८) प्रवेश (वर्ग ९-१०) व मनन (११-१२) या इंग्रजी, हिंदी, मराठी माध्यमातून घेतल्या गेलेल्या....

Filling the district in the Gandhi Jeevan-Prasna examination | गांधी जीवन-विचार परीक्षेत जिल्ह्याची भरारी

गांधी जीवन-विचार परीक्षेत जिल्ह्याची भरारी

विद्यार्थ्यांनी रोवला मानाचा तुरा : महर्षी विद्यामंदिर, सारडा महिला आणि गांधी शाळेचे यश
भंडारा : गुजरात विद्यापीठाद्वारे २ आॅक्टोबर २०१५ ला झांकी (वर्ग ५ ते ८) प्रवेश (वर्ग ९-१०) व मनन (११-१२) या इंग्रजी, हिंदी, मराठी माध्यमातून घेतल्या गेलेल्या परीक्षांचा निकाल ७८ टक्के लागून १९८३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
राज्यात प्रथम प्रवेश परीक्षेत इंग्रजी माध्यमातून, महर्षी विद्या मंदिर फुलमोगरा चा प्रतीक अरुण शेंडे, मराठी माध्यमातून श्रीमती सावित्रीदेवी शिवनारायण सारडा महिला विद्यालयाची स्नेहा गणेश निपाने आणि झांकी परीक्षेत नगरपरिषद गांधी विद्यालयाचा सिराज अ.कासिम सिद्धीकी, महाराष्ट्र राज्यातून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले.
मनन या परीक्षेत हिंदी माध्यमातून नूतन कन्या कनिष्ठ महाविद्यालयाची धनश्री घनश्याम लांजेवार आणि मराठी माध्यमातून लाल बहादूर शास्त्री कनिष्ठ महाविद्यालयाची प्रियंका रामदास नंदेश्वर जिल्ह्यात प्रथम आल्या. जिल्ह्यातून मराठी माध्यमातून जकातदार कनिष्ठ महाविद्यालयाची मृणाल विलास बांते दुसरी तर नूतन कन्या कनिष्ठ महाविद्यालयाची मयुरी चक्रधर कांबळे तिसरी आली.
प्रवेश परीक्षेत जिल्ह्यातून हिंदी माध्यमातून न.प. गांधी विद्यालयाची हुमैरा फिरदोस खान प्रथम, इंग्रजी माध्यमातून महर्षी विद्या मंदिरची अंजली शरद चुटे प्रथम, रॉयल पब्लिक स्कुलची खुशी संतोष शहारे दुसरी तर सनफ्लॅग इंग्लीश स्कुल वरठीची जान्हवी सुखानी तिसरी आली.
याच परीक्षेत मराठी माध्यमातून लाल बहादूर शास्त्री विद्यालयाचा आदित्य नंदलाल सरवडे जिल्ह्यात प्रथम तर बन्सीलाल लाहोटी नूतन महाराष्ट्र विद्यायलाचा आयुष नंदकिशोर पंचबुद्धे तिसरा आला.
झांकी परीक्षेत जिल्ह्यातून इंग्रजी माध्यमातून सेंट मेरी पब्लिक स्कूलचा सुजित इंद्रकुमार बर्वे जिल्ह्यात पहिला, सनफ्लॅग इंग्लीक स्कूलची जीगीशा धारस्कर दुसरी तर जेसीस कॉन्व्हेंट इंग्लिश स्कूलची जान्हवी एम. गजभिये तिसरी आली. हिंदी माध्यमातून न.प. गांधी विद्यालयाचा मुशीर जाकीर सैय्यद प्रथम, न.प. मौलाना अ.क. आजाद उर्दू शाळेची तनजिला जाकरी हुसैन दुसरी आली. मराठी माध्यमातून लालबहादूर शास्त्री विद्यालयाची अंजली महेश शहा जिल्ह्यातून प्रथम, संत शिवराम उच्च प्राथमिक शाळेची ऐश्वर्या प्रदीप तितीरमारे दुसरी तर महिला समाज प्राथमिक शाळेची साहिली देवप्रकाश निमजे तिसरी आली. या सर्व प्राविण्य धारकांना प्रमाणपत्रांसोबत पुस्तके आणि नगदी बक्षीसे मिळतील असे परीक्षा संयोजक गांधी विचार मंचाचे अध्यक्ष प्रा.वामन तुरिले यांनी सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: Filling the district in the Gandhi Jeevan-Prasna examination

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.