भरधाव ट्रकने तोडली घराची सुरक्षा भिंत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2018 21:49 IST2018-08-22T21:49:25+5:302018-08-22T21:49:44+5:30
भरधाव ट्रक अनियंत्रीत होवून वीज खांबाला धडक देवून एका घराच्या सुरक्षा भिंतीवर जाऊन धडकला. यात सुरक्षा भिंत उध्वस्त झाली. ही घटना येथील स्टेशन रोडवरील राजेंद्र वॉर्डात मंगळवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास घडली. सुदैवाने ट्रक सुरक्षा भिंतीला अडल्याने मोठा अनर्थ टळला.

भरधाव ट्रकने तोडली घराची सुरक्षा भिंत
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : भरधाव ट्रक अनियंत्रीत होवून वीज खांबाला धडक देवून एका घराच्या सुरक्षा भिंतीवर जाऊन धडकला. यात सुरक्षा भिंत उध्वस्त झाली. ही घटना येथील स्टेशन रोडवरील राजेंद्र वॉर्डात मंगळवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास घडली. सुदैवाने ट्रक सुरक्षा भिंतीला अडल्याने मोठा अनर्थ टळला.
नागपूर येथून एक अवजड ट्रक भंडारा शहरातून मंगळवारी रात्री जात होता. शास्त्री चौकापासून हा ट्रक अनियंत्रीत झाला. एका वीज खांबाला धडक देऊन ट्रक राजेंद्र वॉर्डातील कवरीलाल भलगट यांच्या घराच्या सुरक्षा भिंतीला धडकला. यात ४० फुट सुरक्षा भिंत उध्वस्त झाली. त्यांचे पार्कींगचे शेडही तुटले. तसेच एका स्कुुटीचाही चेंदामेंदा झाला. वीज खांबाला धडक दिल्याने या भागातील वीज प्रवाह खंडीत झाला होता. हा प्रकार माहित होताच अनेकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. मात्र तोपर्यंत चालक ट्रक सोडून पळून गेला होता. या घटनेची माहिती भंडारा पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. तसेच वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी वीज प्रवाह सुरळीत करण्यासाठी रात्रीच प्रयत्न सुरु केले. सुदैवाने या घटनेत कुणालाही दुखापत झाली नाही.