मंगळवारी भरतो बाजार

By Admin | Updated: May 15, 2014 01:06 IST2014-05-15T01:06:03+5:302014-05-15T01:06:03+5:30

धानाचे कोठार म्हणून प्रसिद्ध तुमसर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सध्या गुळाची आवक वाढली

Filled markets on Tuesday | मंगळवारी भरतो बाजार

मंगळवारी भरतो बाजार

प्रति क्विंटल केवळ २,५०० ते २,८०० दराने विक्री दोन हजार क्विंटल गुळाची विक्रमी आवक

तुमसर :

धानाचे कोठार म्हणून प्रसिद्ध तुमसर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सध्या गुळाची आवक वाढली असून दर मंगळवारी दोन हजार क्विंटल गुळ विक्रीला येत आहे. शेतकर्‍यांना यामुळे अल्प किंमतीत गुळाची विक्री करावी लागत आहे. उलट बाजारा गुळाची किंमत जास्त आहे. आवक वाढल्याने व्यापार्‍यांची येथे बल्ले बल्ले दिसत आहे. तुमसर कृषी उत्पन्न बाजार समितीत दर मंगळवारी गुळाचा बाजार भरतो. येथे महाराष्ट्र व मध्यप्रदेशातील गुळ विक्रीकरीता येतो. बावनथडी व वैनगंगा नदी परिसरात ऊस लागवड केली जाते.

यावर्षी गुळाची विक्रमी आवक झाली आहे. दर आठवड्याला सुमारे दोन हजार क्विंटल गुळ बाजारात समितीमध्ये विक्रीकरीता येत आहे. यावर्षी प्रतिक्विंटल २५०० ते २७०० चा भाव आहे, परंतु खर्च पाहता हा भाव अत्यल्प आहे, अशा प्रतिक्रिया शेतकर्‍यांच्या आहेत. उत्पादन व खर्च याची तफावत पाहता गुळाचे उत्पादन परवडत नाही. त्यामुळे पुढील काळात गुळाचे उत्पादन बंद करण्याचा निर्णय शेतकर्‍यांना घ्यावे लागणार आहे. शासनाने गुळ उत्पादन करणार्‍या शेतकर्‍यांकरिता पॅकेज उपलब्ध करून देणे व धानाप्रमाणेच गुळाचा शासकीय दर निश्चित करणे गरजेचे आहे. भंडारा जिल्हा धानशेतीचा असला तरी जिल्ह्यात दोन साखर कारखाने सुरू झाल्यामुळे ऊस पिकांची शेती करण्याकडे शेतकर्‍यांचा कल वाढलेला आहे. ही शेतकर्‍यांसाठी पर्वनी ठरणारे आहे. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Filled markets on Tuesday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.