रस्त्यावरील खाच-खळगे भरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:39 IST2021-08-25T04:39:44+5:302021-08-25T04:39:44+5:30
पालांदूर : पालांदूर ते मऱ्हेगाव येथील अंतर्गत रस्त्याला जीवघेणे खड्डे धोकादायक ठरू पाहत आहेत. या खाच-खड्ड्यांना भराव ...

रस्त्यावरील खाच-खळगे भरा
पालांदूर : पालांदूर ते मऱ्हेगाव येथील अंतर्गत रस्त्याला जीवघेणे खड्डे धोकादायक ठरू पाहत आहेत. या खाच-खड्ड्यांना भराव देणे अत्यंत आवश्यक आहे. पालांदूर ते जैतपूर (बारव्हा) हा राज्य मार्ग झाला असून खाच खड्ड्यांनी भरलेला आहे. सुरळीत रहदारी करिता बांधकाम विभागाने पुढाकार घेण्याची मागणी मऱ्हेगावचे,माजी सरपंच श्यामाजी बेंदवार, ज्येष्ठ नेते दामाजी खंडाईत, उपसरपंच हेमराज कापसे यांनी केले आहे.
चुलबंद खोऱ्यात मऱ्हेगाव, पाथरी, जैतपूर /बारव्हा येथे जाण्याकरिता हा रस्ता अत्यंत महत्त्वाचा आहे. रेतीच्या अवैध/ वैध वहनाने रस्ते खड्डेमय झालेले आहेत. साधे पायी चालणे सुद्धा कठीण आहे. तेव्हा किमान प्राथमिक टप्प्यात खड्ड्यांना गिट्टी बोलडरचा भराव महत्त्वाचा आहे. याकरिता पालांदूर परिसरातील स्थानिक लोकप्रतिनिधीसह जबाबदार नागरिकांनी सुद्धा बांधकाम विभागाशी संपर्क केलेला आहे. पालांदूर येथील अंतर्गत असलेला मुख्य रस्ता सुद्धा जागोजागी फुटलेला आहे.
गत १२ ते १३ वर्षांपासून या रस्त्याला बांधकाम विभागाने न्याय दिलेला नाही. वारंवार बांधकाम विभागाला सूचना दिलेल्या आहेत. पावसाळ्याचे दिवस असल्याने जागोजागी रस्त्याला डबक्याचे स्वरूप आलेले आहे. तेव्हा याही अंतर्गत रस्त्याला न्याय मिळावा याकरिता शाखा अभियंता पाल यांच्याशी संपर्क करून थेट फुटलेल्या रस्त्याची पाहणी करण्यात आली. श्यामा बेंदवार यांनी मऱ्हेगाव रस्त्यावरील खड्डे दाखविले. तर हेमराज कापसे यांनी गावातील अंतर्गत रस्त्यावरील खड्ड्याचे वास्तव रूप दाखविले.
बॉक्स
सार्वजनिक बांधकाम विभाग लाखांदूर व बांधकाम विभाग साकोली यांच्याशी भ्रमणध्वनीवरून चर्चा करून रस्त्याच्या दुरुस्ती करिता सकारात्मक चर्चा पार पडली. हप्ताभराच्या आत शक्य त्या ठिकाणी खड्ड्याला भराव करण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे संकेत उपविभागीय अभियंता मटाले व शाखा अभियंता आर. के. पाल यांनी आश्वस्त केले.