शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसे-शिवसेना युतीत जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला; कोण किती जागा लढवणार? समोर आली माहिती
2
ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांची गाडी अज्ञात व्यक्तीने पेटवली; जालन्यातील घटना
3
एका महिलेचा कॉल अन् करोडपती बँकरला २३ कोटींचा गंडा; एक महिन्यासाठी केले डिजिटल अरेस्ट
4
Monsoon update: यंदाची दिवाळी पावसातच जाणार का? मान्सून भारतातून कधी परत जाणार?
5
Video - हायव्होल्टेज ड्रामा! लग्नाचं वेड, जीवाशी खेळ; गर्लफ्रेंड न भेटल्याने 'तो' टॉवरवर चढला
6
Health Tips: पाणी पिण्याची योग्य वेळ कोणती? जेवण करण्यापूर्वी, जेवण करताना की जेवणानंतर? 
7
"ऑपरेशन सिंदूरचा पार्ट २, पार्ट ३ अजून बाकी"; राजनाथ सिंहांचा पाकिस्तानला 'मेसेज', मोरक्कोमध्ये काय बोलले?
8
खेळण्यातली बंदूक वापरली अन् ३ बँकांवर डल्ला मारला! पोलिसांनी दरोडेखोराला पकडताच समोर आलं धक्कादायक सत्य
9
सणासुदीच्या काळात कार खरेदी करणे झाले स्वस्त! जीएसटीमध्ये मोठी कपात, कर्जही झाले स्वस्त
10
पाकिस्ताननं कर्जाच्या आकडेवारीत असं काय लपवलं की, अमेरिकेनं दिला अल्टिमेटम; भारताशी तर कनेक्शन नाही ना?
11
दणदणीत विजयानंतर गंभीरने पाकिस्तानला डिवचले, खेळाडूंना अशी सूचना देत जखमेवर मीठ चोळले
12
ब्रेकअपचं खोटं अन् हत्येनंतरचा बनाव...कानपूर सुटकेस 'कांड' प्रकरणात ट्विस्ट, २ आरोपींना अटक
13
Accident: पाण्याचा टँकर आणि दुचाकीत भीषण धडक; तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू
14
डोनाल्ड ट्रम्प अन् इलॉन मस्कची 'दिलजमाई' झाली? चार्ली किर्कच्या शोकसभेत दिसले एकत्र! ‘तो’ एक फोटो चर्चेत
15
VIRAL: रिक्षात बसलेल्या विदेशी तरुणाला रिक्षाचालकाने फ्रेंचमध्ये विचारला प्रश्न; त्यानंतर जे झालं ते...
16
'या' ग्राहकांना हेल्थ इन्शुरन्सवर GST माफीचा फायदा नाही; आरोग्य विम्या कंपन्यांनी केलं स्पष्ट
17
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' सिनेमात मराठी मालिकाविश्वातील 'या' अभिनेत्याची लागली वर्णी, स्वतः दिली माहिती
18
"पैसे कमावतो, टॅक्स भरतो; चोरी करत नाही...", तगड्या कमाईवरुन अक्षय कुमारचं स्पष्टीकरण
19
FD-RD विसरुन जाल, LIC ची ही स्कीम आहे जबरदस्त, मुलीच्या लग्नासाठी मिळेल २७ लाखांची रक्कम
20
फक्त गरबाच खेळा...हुल्लडबाजी नको; दांडियामध्ये साध्या वेशात महिला पोलीस सहभागी होणार

१५ दिवस तरी विद्यार्थ्यांना खाऊ घाला हो...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2017 23:32 IST

शालेय पोषण आहारातील तेल अन् मीठही संपले. तरीही विद्यार्थ्यांना खाऊ घाला. कोणताही खंड पडू देऊ नका. १५ दिवसानंतर तजवीज शासन स्तरावरून केली जाईल.

ठळक मुद्देतेल अन् मीठही संपले : मुख्याध्यापकांना खरेदीचे अधिकार

राजू बांते।लोकमत न्यूज नेटवर्कमोहाडी : शालेय पोषण आहारातील तेल अन् मीठही संपले. तरीही विद्यार्थ्यांना खाऊ घाला. कोणताही खंड पडू देऊ नका. १५ दिवसानंतर तजवीज शासन स्तरावरून केली जाईल. पण, किमान पंधरा दिवस तरी विद्यार्थ्यांना उपाशी ठेऊ नका, अशी आर्त साद मुख्याध्यापकांना घालण्यात आली आहे.मोहाडी पंचायत समितीच्या सभागृहात शालेय पोषण आहार या विषयावर मुख्याध्यापकांची सभा घेण्यात आली. या सभेत कधी नव्हे अशी आग्रही विनवणी अधिकाºयांनी मुख्याध्यापकांना केल्याचे आढळून आले. शाळांमध्ये धान्य पुरवठा करणाºया कराराची मुदत १६ जून रोजी संपुष्टात आली. अजूनही शासन स्तरावर करारनामा झालेला नाही. करारनाम्याची कार्यवाही सुरू असल्याचे सभेत सांगण्यात आले. त्यामुळे हरबरा, मूग, वटाणा तसेच तेल, तिखट, मीठ आदी वस्तूची खरेदी संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकाला करावयाची आहे. १५ दिवस पुरेल एवढे इंधन, भाजीपाला व धान्य आदी साहित्यांची खरेदी करण्याची सूचना सभेत देण्यात आली. त्यानंतर मुख्याध्यापकांनी संताप व्यक्त केला. साहित्य खरेदी करण्यासाठी कुठून रूपये आणायचे. मालाची खरेदी केली तर शाळा समिती, शाळा व्यवस्थापन समितीचे आक्षेप वाढतील. त्यामुळे मुख्याध्यापकांना मानसिक त्रास सहन करावा लागणार असा सवाल उपस्थित करण्यात आला. धान्याची किंंमत बाजारात वेगवेगळी आहे. त्यामुळे शासनाने किंमत ठरवून दिली पाहिजे होती. मुख्याध्यापक धान्य आदी साहित्याचे बिल आणतील तेव्हा खरेदी किंमत वेगवेगळी राहणार आहे. यामुळे गोंधळ वाढणार आहे.शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत प्राथमिक वर्गासाठी धान्य पुरविण्याचा खर्च प्रति विद्यार्थी २.६२ रूपये, इंधन, भाजीपालासाठी १.५१ रूपये तर उच्च प्राथमिक वर्गासाठी धान्यासाठी ४.०१ रूपये, इंधन व भाजी पालासाठी २.१७ रूपये प्रति विद्यार्थी खर्च मिळणार आहे. या दरानुसारच अन्न शिजविणाºया यंत्रणांनी धान्य व साहित्याची खरेदी स्वत: करावी असे सभेत सांगण्यात आले. धान्य व वस्तु खरेदीचे पक्के बिले, पावत्या पंचायत समितीकडे सादर करण्यात यावे. १५ दिवसात शाळेच्या खात्यावर रक्कम मिळण्याची सोय केली जाणार आहे. यावर मुख्याध्यापकांनी आक्षेप नोंदविला. मागील सहा महिन्यापासून शालेय पोषण आहाराचे बिल देण्यात आले नाही. मग, धान्याचे बिल १५ दिवसात कसे दिले जातील, असा प्रश्न केला असता त्यावर अधीक्षक जिभकाटे यांनी १५ दिवसात बिल दिले जातील, असे सांगितले. शासनाने धान्य खरेदीचा करार केला नाही. तर १५ दिवसानंतर धान्य व इंधन, भाजीपाल्याचे काय यावर प्रश्न उपस्थित करण्यात आला. यावेळी अधिकाºयांना निरूत्तर व्हावे लागले. शासन आपल्याकडील धान्य व अन्य साहित्य खरेदी करण्याची जबाबदारी झटकत असल्याची शंका उपस्थित मुख्याध्यापकांनी व्यक्त केली. परिस्थिती कशीही असो, विद्यार्थी आपलेच आहेत ही भावना ठेऊन विद्यार्थ्यांना खावू घाला. जर शालेय पोषण आहारात खंड पडू दिला तर उच्च न्यायालयाच्या निकालानुसार मुख्याध्यापकांवर प्रशासकीय कारवाई केली जाईल, असे सांगण्यात आले.एकीकडे मुख्याध्यापकांना नम्रता, विनंतीवजा करायची तर दुसºया बाजूला न्यायालयाच्या निकालाचा धाक दाखविण्याचा प्रकार केला जात आहे. खिंडीत सापडलेल्या मुख्याध्यापकांना धान्य व अन्य साहित्य खरेदी पगारातून करावी लागणार आहे. या प्रकारामुळे मुख्याध्यापकांमध्ये शासन धोरणाविरूद्ध संताप निर्माण झाला आहे. या सभेला गटशिक्षणाधिकारी रमेश गाढवे, शालेय पोषण आहार अधिक्षक जिभकाटे, वरिष्ठ विस्तार अधिकारी भास्कर गभणे, विभावरी पडोळे, केंद्रप्रमुख जयंत उपाध्ये उपस्थित होते.धान्य व अन्य साहित्य खरेदीनंतर विविध अडचणी निर्माण होतील. शिक्षकांच्या खिशाला फटका बसेल. खरेदी केल्यानंतर त्यापुढे खरेदी करावी लागणार नाही. याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.-किशोर ईश्वरकर, अध्यक्ष, अ.भा. प्राथमिक शिक्षक संघ, मोहाडी.