शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
5
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
6
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
7
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
8
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
9
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
10
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
11
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
12
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
13
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
14
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
15
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
16
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
17
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
18
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
19
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
20
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
Daily Top 2Weekly Top 5

घरी वडिलांचे पार्थिव अन् लेकीने दिला बारावी इंग्रजीचा पेपर; भंडारा जिल्ह्यातील दुर्दैवी घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2026 15:15 IST

Bhandara : एकीकडे वडिलांचा अपघाती मृत्यू. घरात शोककळा… आणि दुसरीकडे बारावीची परीक्षा ! अशा अत्यंत दुर्दैवी व कठिण परिस्थितीतही लेकीने धैर्याने परीक्षा दिली.

तुमसर (भंडारा) : एकीकडे वडिलांचा अपघाती मृत्यू. घरात शोककळा… आणि दुसरीकडे बारावीची परीक्षा ! अशा अत्यंत दुर्दैवी व कठिण परिस्थितीतही लेकीने धैर्याने परीक्षा दिली. जान्हवी हौशीलाल राहांगडाले असे या लेकीचे नाव असून तीची कहाणी मन हेलावून टाकणारी आहे. दुःखाच्या गर्तेतही शिक्षणाची मशाल हातात घट्ट पकडणाऱ्या जान्हवीच्या जिद्दीने अनेकांच्या डोळ्यांत अश्रू तर अनेकांसमोर प्रेरणा निर्माण केली आहे.

तुमसर तालुक्यातील आंबागड येथील रहिवासी हौशीलाल राहांगडाले (५१) हे सोमवार दुपारच्या सुमारास सायकलने घरी परत येत असताना त्यांचा तोल गेल्याने ते खाली कोसळले. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. काही वेळातच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. क्षणात कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. दरम्यान, मंगळवारी (१० फेब्रुवारी) बारावी बोर्ड परीक्षेचा पहिला दिवस होता. हौशीलाल राहांगडाले यांची कन्या जान्हवी हिचा इंग्रजी विषयाचा पेपर होता. ती जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, तुमसर येथील विद्यार्थिनी असून याच परीक्षा केंद्रात सकाळी दहाच्या सुमारास मामाच्या मुलासोबत परीक्षा केंद्रात दाखल झाली.

कुटुंबीयांनी शाळेचे मुख्याध्यापक पंकज बोरकर व केंद्र संचालक प्रा. नीलकंठ कापगते यांना जान्हवीच्या वडिलांच्या मृत्यूची माहिती दिली. दोघांनीही तिला धीर देत मानसिक आधार दिला.

डोळ्यांत अश्रू, मनात वडिलांचे स्मरण… तरीही जान्हवीने खंबीरपणे इंग्रजीचा पेपर सोडविला. परीक्षा पूर्ण होताच तीने अश्रूंना वाट मोकळी करून दिली. ‘बारावीची परीक्षा ही जीवनातील टर्निंग पॉईंट’. वडिलांचा चेहरा सतत डोळ्यांसमोर येत होता, पण त्यांच्या स्वप्नांसाठी मी ही परीक्षा दिली‘ अशी भावनिक प्रतिक्रियाही जान्हवीने व्यक्त केली.

जान्हवी ही हुशार विद्यार्थिनी

जान्हवी ही अभ्यासात अत्यंत हुशार असल्याचे तिला शिकविणारे प्रा. नितीन पाटील, प्रा. गणेश चाचीरे यांनी सांगितले. तिच्या घरची आर्थिक परिस्थिती ही अत्यंत बेताची आहे. परिस्थितीवर मात करून तिने शिक्षण घेण्याचे ठरविले. आंबागड ते तुमसर हे अंतर आठ किलोमीटर आहे. दररोज मात्र ती नियमित येत होती.

वडिलांच्या लाडाची

मुली ह्या वडिलांच्या अतिशय लाडाच्या असतात. ती बाब जान्हवी बाबतही आहे. जानवी ही आपल्या वडिलांच्या अगदी जवळ होती. वडिलांचे छत्र हरपल्याने तिच्यावर निश्चितच दुःखाचा डोंगर कोसळला आहे. पण तीने स्वत:ला सावरत पेपर देण्याचा निर्णय घेतला. पेपर दिल्यानंतर जान्हवी दुपारी गावात परतल्यानंतर तिच्या वडिलांच्या पार्थीवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी संपूर्ण आंबागड गाव हळहळला.

English
हिंदी सारांश
Web Title : Daughter takes exam after father's death: Heartbreaking incident in Bhandara.

Web Summary : Despite her father's sudden death, Janhavi bravely appeared for her 12th-grade English exam. Overcoming grief, the determined student wrote the paper, honoring her father's dreams. The tragic incident in Bhandara highlights Janhavi's resilience and dedication to education amidst personal tragedy.
टॅग्स :HSC / 12th Exam12वी परीक्षा