तुमसरात सात उमेदवारांचे भाग्य मतपेटीत बंद

By Admin | Updated: January 11, 2016 00:37 IST2016-01-11T00:37:16+5:302016-01-11T00:37:16+5:30

नगर परिषद प्रभाग १ मधील पोटनिवडणुकीत रविवारी ६० टक्के मतदान झाले. निवडणूक शांततेत पार पडली.

The fate of seven candidates in the ballot box is closed | तुमसरात सात उमेदवारांचे भाग्य मतपेटीत बंद

तुमसरात सात उमेदवारांचे भाग्य मतपेटीत बंद

आज मतमोजणी : उत्कंठा शिगेला, पिंपळगावातही रणधुमाळी
तुमसर : नगर परिषद प्रभाग १ मधील पोटनिवडणुकीत रविवारी ६० टक्के मतदान झाले. निवडणूक शांततेत पार पडली. एकुण सात उमेदवारांचे भाग्य मतपेटीत बंद झाले असुन सोमवारी मतमोजणी होणार आहे. नगरसेवकाच्या मृत्यूमुळे येथे पोटनिवडणूक घेण्यात आली आहे.
तुमसर नगरपरिषदेच्या वॉर्ड क्रमांक १ मध्ये रिक्त जागेकरिता रविवारी मतदान पार पडले. येथे एकूण सात उमेदवार निवडणुकीला उभे होते. यात गजभिये नितीन रमेश अपक्ष, गडपायले प्रमोद जनार्दन - राका, डहाट अधिर नानाजी - अपक्ष, भवसागर किशोर हरिराम - अपक्ष, वासनिक निलेश भिमराव - काँग्रेस, मेश्राम नवनाथ बाजू - कमळ, साठवणे अनिल - अपख यांचा समावेश आहे.
एका वर्षानंतर निवडणूक पुढे असल्याने मतदार तथा राजकीय नेत्यात येथे उत्साह दिसला नाही. मोठे राजकीय नेते इकडे फिरकले नाही. उमेदवार व त्यांच्या समर्थकानीच येथे प्रचार केला.
सोमवारी सकाळी १० वाजतापासून तुमसर नगरपरिषदेत मतमोजणी सुरु होईल. येथे ६० टक्के मतदान झाले. या प्रभागात एकूण मतदार ५७०२ इतके आहेत. प्रत्येक उमदेवारांने शेवटपर्यंत किल्ला लढविला. निकाल कुणाच्या बाजूने लागतो ते आज कळणार आहे. (तालुका प्रतिनिधी)

पिंपळगाव पोट निवडणुकीत ६१.८४ टक्के मतदान
लाखनी : तालुक्यातील पिंपळगाव (सडक) पंचायत समिती क्षेत्राची पोटनिवडणुकीचे मतदान पार पडले. मतदानाची टक्केवारी ६१.८४ होती. एकुण ४९५७ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यात स्त्रीयांची संख्या २४५९ आहे तर पुरुष मतदार २४९८ आहेत. चार उमेदवार निवडणुक रिंगणात आहे उद्या सकाळी १० वाजता मतमोजणीला प्रारंभ होणार आहे. निवडणुकीत काँग्रेसचे पंकज शामकुंवर, भाजपाचे सुबोध मेश्राम, राष्ट्रवादी काँग्रेसचे सुधिर मेश्राम, बसपाचे हर्षदिप गणविर निवडणुक रिंगणात होते. चारही उमेदवारांचे भाग्य मशिनबंद झाले आहे. निवडणुक ११ मतदान केंद्रावर पार पडली. पिंपळगाव (सडक), खैरी, सामेवाडा, सेलोटी, रेंगेपार (कोहळी), चिचटोला, धाबेटेकडी येथील मतदारांनी मतदानकेले. मतदारांमध्ये उत्साह दिसून आला नाही. काँग्रेसचे मुन्ना नंदेश्वर यांचे निधन झाल्यामुळे रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणुक घेण्यात आली.

Web Title: The fate of seven candidates in the ballot box is closed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.