शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी, शेतमजुरांचा तहसील कार्यालयावर मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2016 00:36 IST

गोसीखुर्द प्रकल्पग्रस्तांच्या समस्याबाबत शासन व प्रशासन उदासीन आहे. समस्या दुर्लक्षित ठेवून धरणात पाणी वाढवून प्रकल्पग्रस्तांचे जीवन अस्ताव्यस्त केल्या जात आहे.

पवनी : गोसीखुर्द प्रकल्पग्रस्तांच्या समस्याबाबत शासन व प्रशासन उदासीन आहे. समस्या दुर्लक्षित ठेवून धरणात पाणी वाढवून प्रकल्पग्रस्तांचे जीवन अस्ताव्यस्त केल्या जात आहे. त्यामुळे आंदोलनाच्या माध्यमातून प्रकल्पग्रस्तांचे समस्याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी स्थानिक आमदारांचे जनसंपर्क कार्यालय व तहसीलदार कार्यालयावर मोर्चा नेऊन मुख्यमंत्र्यांच्या नावे निवेदन सादर करण्यात आले.निवेदनातील मागण्यांनुसार मौजा खापरी (रेहपाडे) गावाची थांबविण्यात आलेली पुनर्वसन प्रक्रिया सुरु करण्यात यावी. खापरी गाव उमरेड -कऱ्हांडला अभयारण्यात येत असल्याने हिंस्त्र प्राण्यांचा त्रास ग्रामस्थांना होत आहे. नेरला गावाची पुनर्वसन प्रक्रिया सुरु करावी. मौजा सुरबोडी गावाची ८० टक्के शेतजमीन अधिग्रहीत झाली. त्यामुळे गावठाणाची पुनर्वसन प्रक्रिया त्वरीत सुरु करावी, अशी मागणी आहे.नेरला उपसिंचन करीता जमीन अधिग्रहीत करण्यात आली. त्यासाठी पुनर्वसन अनुदान व पॅकेज त्वरीत देण्यात यावे. मौजा गायडोंगरी - कवडसी, उमरेड, कऱ्हांडला अभयारण्यात येत असल्याने त्या गावांचे पुनर्वसन करण्यात यावे. प्रकल्पग्रस्तांचे प्रत्येक स्वतंत्र कुुटुंबाला नोकरी ऐवजी रु. ५ लक्ष देण्यात यावे, पुनर्वसन होईस्तोवर धरणातील पाण्याची पातळी २४१.५ मिटर तलांकाच्या पुढे वाढविण्यात येवू नये. अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत प्रकल्पबाधीत गावातील नागरिकांना अन्नधान्य व केरोसीन तेलाचे वाटप करण्यात यावे. प्रकल्पात प्रकल्पग्रस्तांना कायमस्वरुपी मासेमारीचे अधिकार देण्यात यावे. जिल्हा पुनर्वसन समितीचे गठण करण्यात यावे. शासनाच्या नाविण्यपूर्ण योजनाअंतर्गत दुग्ध व्यवसाय, कुक्कुटपालन, शेळीपालन या योजना विशेष बाब म्हणून प्रकल्पग्रस्तांसाठी राबविण्यात याव्यात, आदी मागण्या असलेले निवेदन गोसीखुर्द प्रकल्पग्रस्त शेतकरी, शेतमजूर व मच्छीमार कृती समितीचे संयोजक राम बांते यांच्या नेतृत्वात मोर्चा काढून आमदार अ‍ॅड.रामचंद्र अवसरे यांच्या जनसंपर्क कार्यालयात त्यांना व तहसील कार्यालयात तहसीलदारांना निवेदन सादर करण्यात आले. मोर्चामध्ये नितीन कोदाने, तुलशीदास भोयर, भागवत दिघोरे, प्रदीप गजभिये, जितेंद्र रेहपाडे तसेच खापरी, गायडोंगरी, परसोडी, नेरला येथील प्रकल्पग्रस्त शेतकरी, शेतमजूर मच्छीमार नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. (तालुका / शहर प्रतिनिधी)