शेतकऱ्यांना रेशीम लागवडीसाठी मिळणार प्राेत्साहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 04:34 IST2021-04-25T04:34:59+5:302021-04-25T04:34:59+5:30
यावेळी जिल्हा रेशीम कार्यालयाचे वरिष्ठ तांत्रिक सहायक अनिलकुमार ढाेले, नायब तहसीलदार एम. एम. हुकरे, एस. ए. लाेणारे, आर. एम. ...

शेतकऱ्यांना रेशीम लागवडीसाठी मिळणार प्राेत्साहन
यावेळी जिल्हा रेशीम कार्यालयाचे वरिष्ठ तांत्रिक सहायक अनिलकुमार ढाेले, नायब तहसीलदार एम. एम. हुकरे, एस. ए. लाेणारे, आर. एम. लाेहारे यांच्यासह जिल्हा रेशीम कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित हाेते. राज्य शासनाने रेशीम शेतीचे महत्त्व शेतकऱ्यांना कळावे व त्यातून मिळणारा हमखास शाश्वत उत्पन्नाची शेतकऱ्यांना ग्रामीण स्तरावर माहिती व्हावी यासाठी सन २०२१ मध्ये तुती लागवड व टसर रेशीम लाभार्थ्यांची नाव नाेंदणी करण्यासाठी राज्यभर महारेशीम अभियान राबविण्यात सुरुवात केली आहे. यावेळी प्रत्येक तालुक्यात शेतकऱ्यांना मार्गदर्शनासाठी सभा घेतल्या जात आहेत.
यामध्ये भंडारा तालुक्यातील काेथुर्णा गराडा बुज. बासाेरा खापा, तर पवनी तालुक्यातील निष्टी भुयार, मेंढेगाव, काकेपार, तर लाखांदूर तालुक्यातील मांढळ, आसाेला, माेहरणा, खैरणा, तर माेहाडी तालुक्यातील कान्हळगाव, कांद्री, पाहुणी येथे शेतकरी सभा घेण्यात आल्या आहेत. शेतकऱ्यांना रेशीम अभियानात यामध्ये शेतकऱ्यांचा सहभाग वाढत आहे. तुती लागवड करू इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांनी तसेच ज्या गावाच्या परिसरात ऐन अर्जुन वृक्षांचे जंगल आहे. त्या परिसरातील गावकऱ्यांनी टसर व रेशीम उद्योगाकरिता जिल्हा रेशीम कार्यालय भंडारा येथे संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा रेशीम कार्यालयातील वरिष्ठ तांत्रिक सहायक अनिलकुमार ढाेले यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतांना केले आहे. यावेळी त्यांच्यासाेबत रेशीम कार्यालयातील कर्मचारी एस. ए. लाेणारे, आर. एम. लाेहारे व अन्य अधिकारी व कर्मचारी उपस्थित हाेते. महारेशीम अभियानांतर्गत १५ गावात सभा घेण्यात आल्या आहेत. शेतकऱ्यांना रेशीम लागवडीसाठी नाेंदणीकरिता आवाहन केले आहे.