वनविभागाच्या आगीत शेतपिके स्वाहा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2016 00:42 IST2016-04-14T00:42:13+5:302016-04-14T00:42:13+5:30
वनविभागाने जंगल परिसरातील शेतझाडे जाळण्यासाठी आग लावली. या आगीच्या ज्वाळा शेतात पोहचल्याने एका शेतकऱ्याच्या शेतातील पिके

वनविभागाच्या आगीत शेतपिके स्वाहा
५० लाखांचे नुकसान : शेतकऱ्याने केली नुकसानभरपाईची मागणी
भंडारा : वनविभागाने जंगल परिसरातील शेतझाडे जाळण्यासाठी आग लावली. या आगीच्या ज्वाळा शेतात पोहचल्याने एका शेतकऱ्याच्या शेतातील पिके व फळझाडे जळाल्याचा प्रकार माडगी शेतशिवारात घडला. यात शेतकऱ्याचे ५० लाख रुपयाचे नुकसान झाले.
माडगी येथील शेतकरी कवडू शांतलवार यांचे माडगी शेतशिवारात शेत आहे. गट क्रमांक ३४९/१ हा त्यांचा मुलगा पराग यांच्या नावाने तर गट क्रमांक ४१९/२ हे प्रज्वल या मुलांच्या नावाने आहेत. दोन्ही मुले नोकरीनिमित्त बाहेरगावी राहत असल्याने या शेतीची देखभाल व उत्पादन घेण्याची जबाबदारी वडील कवडू शांतलवार यांच्यावर आहे.
या शेतीमध्ये पराग व प्रज्वल हे शेती उत्पादनासोबतच फळबागाचे उत्पादन घेतात. मंगळवारला नित्याप्रमाणे कवडू घरी असताना दुपारच्या सुमारास त्यांची शेती जळत असल्याची माहिती लगतच्या शेतकऱ्याने त्यांना दिली. या माहितीवरून ते शेतमजुरासह शेतात आग विझविण्यासाठी गेले. महत्प्रयासाने आगीवर नियंत्रण मिळविले.
दरम्यान या आगीत गटक्रमांक ३४९/१ मधील २० वर्षाची आठ चिकूची झाडे पूर्णपणे जळाली. तर पाच ते सहा झाडे आगीच्या ज्वाळात सापडल्याने ते पूर्णपणे जळाले. तर गट क्रमांक ४१९/२ मधील तीन वर्षांची पाच सीताफळाचे झाडे पूर्णपणे जळून खाक झाले.
वनविभागाने पालापाचोळा जाळण्यासाठी लावलेल्या आगीमुळे शेतातील झाडे जळाल्याचा आरोप कवडू शांतलवार यांनी केला आहे. या आगीत त्यांचे ५० लाख रुपयांचे नुकसान झाले असून नुकसानभरपाई देऊन बेकायदेशीरपणे आग लावणाऱ्या वनविभागावर कायदेशिर कारवाई करावी अशी मागणी शांतलवार यांनी केली आहे. (शहर प्रतिनिधी)