शेतकऱ्यांचे उपोषण सुरु
By Admin | Updated: October 29, 2015 01:02 IST2015-10-29T01:02:46+5:302015-10-29T01:02:46+5:30
तालुक्यातील रेंगेपार (कोठा) येथे धान पिकांच्या नापिकीमुळे शेतकऱ्यांनी साखळी उपोषणास प्रारंभ केला आहे.

शेतकऱ्यांचे उपोषण सुरु
दुष्काळ जाहीर करण्याची मागणी : तहसीलदारांनी दिली मंडपाला भेट
लाखनी : तालुक्यातील रेंगेपार (कोठा) येथे धान पिकांच्या नापिकीमुळे शेतकऱ्यांनी साखळी उपोषणास प्रारंभ केला आहे.
उपोषण मंडपाला जिल्हा परिषद अध्यक्षा भाग्यश्री गिलोरकर व तहसिलदार डी.सी. बोंबर्डे यांनी भेट दिली. रेंगेपार (कोठा) ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, शेतकरी बांधवांनी शासनाच्या सुस्त कार्यप्रणालीमुळे कर्जमुक्तीसाठी व शेतकऱ्यांच्या मदतीसाठी आंदोलन छेडले असल्याचे प्रसिद्धीपत्रकात स्पष्ट केले. तहसिलदार बोंबर्डे यांच्यासोबत शेतकऱ्यांच्या मागण्याबाबत चर्चा केली. शेतकऱ्यांची कर्ज माफी करावी, दुष्काळ जाहीर करून् एकरी २५ हजार रूपयाची मदत करावी, सिंचनाची व्यवस्था करावी, अर्जमाफी करून सातबारा कोरा करावा अतिक्रमण धारकांना पट्टे द्यावे, शेतकऱ्यांचे विज बिल माफ करावे, शेतकऱ्यांना शेतात बोअरवेलसाठी अनुदान द्यावे, अशा विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. तहसिलदार बोंबर्डे यांनी पिकांचे सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले.
आंदोलनात सरपंच वैशाली खोब्रागडे, उपसरपंच दिपक काडगाये, देवानंद काडगाये, संयोजक धनंजय लोहबरे, मंगलमुर्ती झंझाड, सुरेश पिंपळशेंडे, रतीराम हजारे, गाविल काडगाये, आनंदराव देशमुख, किरण काडगाये, भुमेश्वर लांडगे, घनशाम हजारे, नंदु काडगाये, नरहरी पिंपळशेंडे, संजय पुडके, खुशाल भांडारकर, सुभाष काडगाये, निलकंठ झंझाड आदी शेतकरी सहभागी झाले होते. (तालुका प्रतिनिधी)