शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढचे उपराष्ट्रपती कोण? मतदान संपले, थोड्याच वेळात मतमोजणी सुरु होणार
2
बाप रे बाप...! एवढ्या संपत्तीचे मालक आहेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली; स्विस बँकतही आहेत कोटीच्या कोटी...!
3
लडाखच्या सियाचीनमध्ये हिमस्खलन, तीन लष्करी जवान शहीद, अनेकजण ढिगाऱ्याखाली, मदतकार्य सुरू
4
योगायोग की मोठं षडयंत्र? गेल्या ४-५ वर्षात भारताच्या शेजारील ४ राष्ट्रांमध्ये 'सत्तापालट'
5
नेपाळचे उपपंतप्रधान बिष्णू प्रसाद यांना निदर्शकांची पाठलाग करून मारहाण, व्हिडीओ व्हायरल
6
पितृपक्ष २०२५: पितृपक्षाच्या संकष्टीला करतात साखर चौथेच्या गणपतीची स्थापना पण, विसर्जन कधी?
7
IND vs PAK : सूर्यकुमार यादवचा आक्रमक बाणा; पाकचा सलमान रिप्लाय देताना उगाच वाकड्यात शिरला (VIDEO)
8
१९९० सालचे जनआंलोदन; नेपाळच्या राजाला सोडावे लागले आपले सिंहासन, असा झाला राजेशाहीचा अंत...
9
आजची तारीख महत्त्वाची, ९९९ चा महायोग; मंगळाचे प्राबल्य, झोपण्यापूर्वी आठवणीने करा 'हे' काम
10
एक अंध तर दुसरा अपंग, तरीही मिळून तिसऱ्याला संपवलं! घटना ऐकून पोलीसही झाले स्तब्ध
11
घरात लग्नाची तयारी, होणाऱ्या पतीसोबत करायचं होतं फोटोशूट पण तरुणीसोबत घडलं आक्रित अन्...
12
बाजाराचा २ महिन्यांचा उच्चांक! गुंतवणूकदारांची १.२३ लाख कोटींची कमाई, 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर
13
पुढील माहिती मिळेपर्यंत नेपाळला जाऊ नका; सरकारने भारतीयांसाठी सूचना दिल्या
14
Nepal Protest : नेपाळमधील आंदोलनाचा सीमेवर परिणाम, सीमेवर परिस्थिती तणावपूर्ण; भारतीय पर्यटकांना रोखले
15
जीएसटीचा 'सुतक'काळ...! शोरुममध्ये कधी नव्हे तो शुकशुकाट...; लोक येतायत अन् विचारून जातायत...
16
दुचाकी दुर्लक्षितच राहिल्या...! जिव्हाळ्याची हिरो स्प्लेंडर ८ हजारांनी कमी होणार, एचएफ डीलक्स ६, एक्स्ट्रीम...
17
९२% नं आपटून १ रुपयांवर आला 'हा' शेअर; आता कंपनी देणार एकावर १० बोनस शेअर्स
18
महापौर ते थेट नेपाळ पंतप्रधानपदाच्या शर्यतीत समोर आलेले बालेन शाह यांची संपत्ती किती?
19
५० लाखांचे गृहकर्ज होईल व्याजमुक्त! फक्त ₹५,०५० ची गुंतवणूक वाचवेल लाखो रुपयांचे व्याज
20
दृष्टिहीन वडिलांसोबत भीक मागायची लेक; अभ्यासात हुशार, परिस्थितीवर मात करत बदललं नशीब

शेतकऱ्यांनो पेरणीसाठी घरचे बियाणे वापरा आणि सेंद्रिय खतावर भर द्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2025 13:08 IST

कृषी केंद्रावर अवलंबून राहू नये : शेतकरी संघटनेचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : शेतकऱ्यांनी वाढलेली फसवणूक व लुबाडणूक टाळण्यासाठी कृषी केंद्रांवर अवलंबून राहू नये. घरीच बीज प्रक्रिया करून निर्जंतुक बियाणे पेरणीसाठी तयार करावे. महागड्या रासायनिक खतांचा वापर मर्यादित करावा. स्वतःच बी-बियाणे तयार करून साठवणूक करावी. जैविक खते, गांडूळ खत, सोनखत आदींचा वापर करावा, असा सल्ला राष्ट्रीय किसान मोर्चाचे जिल्हा प्रभारी अभय रंगारी यांनी दिला आहे.

खरीप हंगामाच्या तोंडावर लाखनी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीद्वारे संचालित कृषी केंद्रात रासायनिक खताची शेतकऱ्यांना विक्री करून १६ लाख ४२ हजारांनी फसवूणक करण्यात आली. तर जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षकांच्या तपासणीत १२९.२५ मेट्रिक टन बोगस खताचा साठा जप्त करण्यात आला. हंगामात बोगस बी-बियाण्यांची विक्री होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी सावधगिरी बाळगावी तसेच बोगस बियाणे व खतांची विक्री करणाऱ्यांवर कृषी विभागाने कठोर कारवाई करावी, अशी अपेक्षा शेतकरी संघटनेकडून व्यक्त करण्यात आली आहे.

बियाण्यांसंबंधी वाढल्या शेतकऱ्यांच्या तक्रारीदरवर्षी बियाणे, खतांसंबंधीच्या तक्रारी वाढलेल्या आहेत. शेतकरी कर्ज घेऊन पिकांची लागवड करतो. मात्र, कृषी केंद्रातील बियाणे पेरणी केल्यानंतर अनेकदा उगवतच नाही. उगवले तर भेसळीचे प्रमाण अधिक असते. काही वेळेस पीक वेळेत कापणीला येत नसल्याने नुकसान होते.

...तर कृषी केंद्रांवर व्हावी कठोर कारवाईखरीप हंगामात फसवणूक झाल्यास शेतकऱ्यांना आर्थिक, मानसिक व सामाजिक त्रासाला सामोरे जावे लागते. त्यामुळे कृषी विभागाने वेळीच तपासणी करून बोगस बियाणे व खताला आळा घालण्यासाठी कठोर तपासणी व कारवाई करावी, प्रसंगी कृषी केंद्र निलंबीत करावे, अशी मागणीही शेतकरी संघटनेच्यावतीने करण्यात आली आहे.

अन्य राज्यांतून बोगस खते, बियाणे विक्रीची शक्यता

  • खरीप हंगामाला सुरुवात झाल्याने लवकरच पेरणीसाठी शेतकरी बी-बियाणे, रासायनिक खते खरेदीसाठी कृषी केंद्रात धाव घेणार आहेत. मात्र, त्यांच्या भोळेपणाचा आणि अज्ञानाचा गैरफायदा प्रसंगी अनेक कृषी केंद्र चालक घेतात. शेतकऱ्यांची फसवणूक करतात.
  • अधिक नफा कमविण्यासाठी बोगस खत कंपन्या, वितरक यांच्याशी संगनमत करून कृषी केंद्र चालक राज्यात परवाना नसलेल्या बी-बियाणे, रासायनिक खते विक्रीस आणू शकतात. राज्याला लागून असलेल्या अन्य राज्यातून बोगस खत व बियाणे येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

"कृषी विभागाने बी-बियाणे व खतांचा तपासणी अहवाल संबंधित कृषी केंद्राच्या दर्शनीय भागात लावण्यासाठी केंद्राला बंधनकारक करायला पाहिजे. तसेच भरारी पथकांनी कितीदा तपासणी केली, किती नमुने गोळा केले, प्रयोगशाळेत पाठविले, याचाही अहवाल संबंधित कृषी केंद्राच्या दर्शनीय भागात लावावा."- अभय रंगारी, जिल्हा प्रभारी, राष्ट्रीय किसान मोर्चा.

टॅग्स :bhandara-acभंडाराfarmingशेतीFarmerशेतकरी