शेतकऱ्यांनी धानावरील शत्रू व मित्र किडींची ओळख करून घ्यावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 04:38 IST2021-08-27T04:38:00+5:302021-08-27T04:38:00+5:30
भंडारा तालुक्यातील बोरगाव येथे क्रॉपसप अंतर्गत शेतीशाळा वर्ग ५ चे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी ते बोलत होते. ...

शेतकऱ्यांनी धानावरील शत्रू व मित्र किडींची ओळख करून घ्यावी
भंडारा तालुक्यातील बोरगाव येथे क्रॉपसप अंतर्गत शेतीशाळा वर्ग ५ चे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी शेती शाळेसाठी मंडळ कृषी अधिकारी विजय हुमणे, होमराज धांडे, भंडारा तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक सतीश वैरागडे, कृषी पर्यवेक्षक वासनिक, कृषी सहाय्यक गिरीश रणदिवे, रोशन भोयर, कृषी मित्र दुबेदास रामटेके व शेतकरी उपस्थित होते. तालुका कृषी अधिकारी
कोटांगले यांनी पीक परिसंस्थेचे सादरीकरण केले. मंडळ कृषी अधिकारी हुमणे यांनी कीटकनाशकांच्या विशाक्ततेच्या श्रेणीची ओळख
हिरवा,निळा,पिवळा,लाल या रंगानुसार ओळख करुन दिली. होमराज धांडे यांनी शेतकऱ्यांना प्रत्यक्ष शेतातील खोडकिडा, अंडीपुंज, कडाकरपा रोगाची ओळख करून दिली. भंडाराचे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक सतीश वैरागडे यांनी शेतकऱ्यांनी कीटकनाशकांची फवारणी करताना घ्यावयाची काळजी व संभाव्य धोके याविषयी मार्गदर्शन केले. गिरीश रणदिवे यांनी शेती शाळेचा उद्देश व शेतकऱ्यांचा कृषी योजनांमध्ये वाढत असलेला सहभाग व पीक परिसंस्थेविषयी माहिती दिली. कृषी पर्यवेक्षक वासनिक यांनी छायाचित्राद्वारे शेतकऱ्यांना मित्र कीड व शत्रू किडींची ओळख करून दाखविली. संचालन कृषिसेवक रोशन भोयर यांनी केले आभार कृषिमित्र दुबेदास रामटेके यांनी मानले. उपस्थित शेतीशाळेत गावातील शेतकरी,२४ विद्यार्थी उपस्थित होते.