शेतकरी म्हणतात, तर नुकसानीची चौकशी करणार कोण?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 04:42 IST2021-02-17T04:42:14+5:302021-02-17T04:42:14+5:30
कालव्याच्या अपूर्ण कामामुळे बेटाळा परिसरातील खरीप व रब्बीचे पीक वारंवार नुकसानग्रस्त होत असल्याने शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ आहे. शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी ...

शेतकरी म्हणतात, तर नुकसानीची चौकशी करणार कोण?
कालव्याच्या अपूर्ण कामामुळे बेटाळा परिसरातील खरीप व रब्बीचे पीक वारंवार नुकसानग्रस्त होत असल्याने शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ आहे. शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी तयार करण्यात आलेला बावनथडी प्रकल्प अधिकाऱ्यांच्या बेजबाबदारपणामुळे कर्दनकाळ ठरू पाहत आहे.
न्यायासाठी बेटाळा येथे उपोषणावर बसलेले शेतकरी म्हणतात, वेळेत वीज बिल भरले नाही तर वीज महामंडळाकडून वीज कापली जाते. सावकार, पतसंस्था, बँक व सोसायट्यांचे कर्ज फेडले नाही तर ट्रॅक्टर व घरातील वस्तू उचलल्या जातात. आता बावनथडी प्रकल्पाचे पाणी मोठ्या प्रमाणात कालव्याद्वारे शेतशिवारात सोडण्यात आल्याने उभे गहू, हरभरा, लाखोरी व अन्य पीक सडली, कुजली. आता नुकसान भरपाई कोण देणार, असा प्रश्न आक्रोशित शेतकऱ्यांनी प्रशासनास विचारला आहे.
व पिकांच्या नुकसान भरपाईसाठी सुरू केलेल्या आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशीही बावनथडी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी चौकशीसाठी साधी भेट दिली नसल्याने शेतकऱ्यांत असंतोष व्यक्त होत आहे.
उपोषणकर्ते यांच्या प्रमुख मागण्या
कृषी विभाग व महसुल विभागाचेवतीने शेतकऱ्यांच्या शेतीचे तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यात यावी. इंदूरखा कालव्याचे बांधकाम पूर्ण करण्यात यावे. जनावरांसाठी चाऱ्याची सोय करण्यात यावी, बेजबाबदारपणास कारणीभूत कार्यकारी अभियंता उजवा कालवा क्रमांक ५ व कार्यकारी अभियंता बावनथडी प्रकल्प श्रेणी १ बघेडा यांच्यावर व कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी आहे.