‘मार्च एंडिंग’चा शेतकऱ्यांना धसका
By Admin | Updated: March 22, 2015 01:37 IST2015-03-22T01:37:48+5:302015-03-22T01:37:48+5:30
जगाचा पोशिंदा म्हणजेच शेतकरी समाजातील सर्वात दुर्लक्षित घटक म्हणजे शेतकरी, वर्षानुवर्षापासून हालअपेष्टा सहन करुन, रक्ताच पाणी करुन,

‘मार्च एंडिंग’चा शेतकऱ्यांना धसका
जगाचा पोशिंदा म्हणजेच शेतकरी समाजातील सर्वात दुर्लक्षित घटक म्हणजे शेतकरी, वर्षानुवर्षापासून हालअपेष्टा सहन करुन, रक्ताच पाणी करुन, कर्ज काढून जमीन कसतो व सर्वतोपरी प्रयत्न करुन पिके घेण्याचा प्रयत्न. परंतु सततची नापिकी, दुष्काळ, निसर्गाचा लहरीपणा, रोगराई, गारपीट यामुळे शेतकऱ्यांच्या आशेवर पाणी फेरल्या जाते.
शेतमालाला योग्य भाव न मिळणे, व्यापाऱ्यांकडून दलालांकडून होणारी लूट, फसवणूक, शेती विरोधी धोरण, पिक विम्याचा खेळखंडोबा यामुळे तर शेतकरी नेस्तनाभूत झाला आहे व चिंतेच्या सावटातच जगत आहे. खरिपाचे पिक हे मुख्य पिक आहे त्या उत्पादनावरच शेतकऱ्यांची रोजीरोटी सुरु असते व वर्षभऱ्याची लेनदेन चालते. मागील वर्षी व त्याआधी सुध्दा तुटपुंज्या पावसामुळे दुबार पेरणीच्या समस्येला शेतकऱ्याला तोंड द्यावे लागले. त्यानंतर कशीबशी रोवणी उरकवून शेतकरी चांगल्यापिकाची आस करत राहिला. परंतु अपुऱ्या पावसामुळे व रोगराईमुळे प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या हातात फारच कमी उत्पन्न मिळाले. दुष्काळ पडला. शेतकरी, हितचिंतक व इतर शासनाकडे मदतीसाठी ओरडतच राहिले. पण लालफीतशाही व बेरोजगार, उदासीन, शासनपध्दतीमुळे शेतकऱ्यांना कसलीही सवलत किंवा मदत मिळाली नाही. तरीही शेतकऱ्याना पोटाला चिमटा देत कसेतरी खते, किटकनाशके व बियाणे यांचा खर्च भरुन काढला., बँका, शहरी संस्था व सावकारी कर्ज मात्र तसाच राहिला.
खरिपाची भरपाई रब्बीमध्ये होईल या आशेने शेतकरी पुन्हा कामाला लागला. मात्र याहीवेळी निसर्गाचा लहरीपणा, ढगाळ वातावरण, अवकाळी पाऊस, गारपीट याने होती नव्हती शेतकऱ्यांची आशा धुळीस मिळाली व कर्जाच्या परतफेडीला कात्री बसली. उचललेला कर्ज ३१ मार्च पूर्वी भरला नाही तर पुन्हा त्यावर बसणारा व्याज यामुळे त्यांच्यावर कर्जाचा डोंगर उभा राहिल्याशिवाय गंत्यतर नाही, ही भीती शेतकऱ्यांमध्ये संचारली आहे. भीतीने काहींनी तर होते नव्हते गोंधण व स्थावर मालमत्ता विक्रीला काढले. काही जण तर स्वत:च्या सधन नातेवाईकाकडे कर्जाच्या परतफेडीसाठी हात पसरत आहेत, पंरतु आल्यापाऊलीच वापस यावे लागले. शेतमालाला तर मातीमोल भावात मागणी असल्यामुळे, कर्जाचा भरणा करायचा कसा असा सक्ष प्रश्न सध्या शेतकऱ्यांपुढे उभा आहे. कर्जाच्या परतफेडीसाठी नानातऱ्हेचे, कधी नव्हे असे गणिते करण्यात शेतकरी व्यस्त आहे, संभाव्य बँकाचे, सहकारी संस्थाचे नोटीस, पुढील दिवसात येणारे अपरिहार्य लग्नसमारंभातील खर्च, उपवर मुलामुलींसाठी करावयाचा लग्नाचा खर्च, धर दुरुस्ती व इतर किरकोळ खर्चाचा विचार करता तुर्तास तरी शेतकऱ्यांची झोपच उडाली असे ग्रामीण परिसरात अनुभवास येत आहे.