विजेच्या धक्क्याने शेतकरी जागीच ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2019 22:55 IST2019-07-08T22:54:57+5:302019-07-08T22:55:15+5:30
शेतातील मोटारपंप चालू करताना विजेच्या धक्क्याने तरूण शेतकऱ्याचा जागीच बापाच्या नजरेसमोर मृत्यू झाला. ही घटना पालांदुरात मऱ्हेगाव कृषी फिडर अंतर्गत घडली. सोमवारला दुपारी १०.१५ च्या सुमारास स्वत:च्याच शेतात घटना घडली. संतोष वासुदेव हटवार (२४) रा. पालांदूर असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.

विजेच्या धक्क्याने शेतकरी जागीच ठार
लोकमत न्यूज नेटवर्क
पालांदूर : शेतातील मोटारपंप चालू करताना विजेच्या धक्क्याने तरूण शेतकऱ्याचा जागीच बापाच्या नजरेसमोर मृत्यू झाला. ही घटना पालांदुरात मऱ्हेगाव कृषी फिडर अंतर्गत घडली. सोमवारला दुपारी १०.१५ च्या सुमारास स्वत:च्याच शेतात घटना घडली. संतोष वासुदेव हटवार (२४) रा. पालांदूर असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.
संतोष हा उमदा शेतकरी होता. पावसाच्या लहरीपणामुळे पºह्यांना पाणी देण्याकतिरा बापासोबत शेतावर गेला. सिंगलफेस मधून मोटार सुरू करताना वायर संतोषच्या हाताला लागला. संतोष ओल्या शरीराने आल्याने व पायात चप्पल अथवा जुता नसल्याने विद्युत करंट लागून पडला. यात तो जागीच ठार झाला. तत्काळ शेजारील शेतकरी धावत आले. पण काही करण्याआधीच गतप्राण झाला. वाºयासारखी बातमी परिसरात पसरली. घटनास्थळी बघ्यांची एकच गर्दी उसळली.
अशीच घटना शुक्रवारला मचारणा येथे घडून स्वप्नील घोनमोडे या विद्यार्थ्याचा करूण अंत झाला. चार दिवसाच्या अंतराने ही दुसरी घटना असल्याने शेतकरी वर्गात चिंता वाढली आहे. महावितरणच्या आशिर्वादाने मध्यरात्री शेतावर पंप सुरू करायला जावेच लागते. त्यामुळे शेतकरी वर्गात धडकी भरली आहे.