शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी संकटात, धान बांधणीचा खर्च प्रतिएकर तीन हजारांवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2024 14:05 IST

Bhandara : मोफत योजनांमुळे धान कापणी, बांधणीसाठी मजूर मिळेना

लोकमत न्यूज नेटवर्क भंडारा : यंदा कीड व रोगांमुळे, तसेच धान कापणीच्यावेळी लष्करी अळीचा प्रादूर्भाव वाढल्याने शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. त्यातच मोफतच्या शासकीय योजनांमुळे धान कापणी, बांधणी व मळणीसाठी मजूर मिळेनासे झाले आहे. शिवाय दरात वाढ झाल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. धान बांधणीसाठी सध्या प्रति एकर धान बांधणीसाठी मजुरांना ३,००० ते ३,५०० रुपये मोजावे लागत आहेत.

जिल्ह्यात सद्यःस्थितीत धान कापणीसाठी महिला मजुरांना २०० ते २५० रुपये मोजावे लागत आहेत, तर बांधणीसाठी पुरुषांकडून प्रतिदिन ४५० ते ५०० रुपये मजुरी घेतली जात आहेत. मागील काही वर्षांपासून धान बांधणीसाठी हुंडा पद्धती वाढली आहे. कापणीसाठी २५०० ते ३००० हजार रुपये प्रति एकरचा दर मजुरांकडून घेतला जात आहे. यावर्षी उत्पादन कमी आणि खर्च अधिक अशी स्थिती आहे. शेती व्यवसाय आता अधिकच कठीण होऊन बसला आहे. अवाढव्य दरवाढ झाल्याने शेती करणे शेतकऱ्यांना कठीण होत आहे. 

खते आणि आणि कीटकनाशके महागली आहेत. परिणामी प्रति एकर लागवडीचा खर्चही वाढलेला आहे. शेतीसाठी वापरण्यात येणारे साहित्य, पाइप, मोटारपंप, विद्युत बिल, त्याचप्रमाणे शेतकऱ्यांपुढे मोठी समस्या मजुरांची आहे. शेतीच्या कामासाठी शोधूनही मजूर मिळत नाहीत. मजूर मिळाल्यास त्याच्या मर्जीनुसार मजुरी द्यावी लागत आहे. आता यांत्रिकीकरणामुळे थोडेसे सोपे झाले असले, तरी विविध उपकरणांच्या वाढत्या किमती, त्यांना लागणाऱ्या इंधनाच्या किमती वाढल्या आहेत. पेट्रोल व डिझेलच्या तुलनेत धान कवडीमोल भावाने विकावा लागत आहे. 

खर्चाच्या तुलनेत हमीभाव परवडेना यंदा धानाला हमीभाव अ ग्रेडसाठी २,३२० रुपये, तर ब ग्रेडसाठी २३०० रुपये प्रति क्विंटल जाहीर झाला आहे. मागील पाच वर्षांत धानाचा हमीभाव फारसा वाढलेला नाही. तुलनेत इंधन, कीटकनाशके आणि शेती अवजारांच्या किमतीत प्रचंड वाढ झाली आहे. आधुनिक यंत्रामुळे पारंपरिक शेती व्यवसाय लोप पावला आहे. त्यातच दरवर्षी शेतकऱ्यांना बारदाणा खरेदी करताना विनाकारण जास्त पैसे मोजावे लागतात.

"सध्या खर्चाच्या तुलनेत शेतीचे उत्पन्न तोकडे आहे. कीड व रोगांमुळे यंदा धान उत्पादनात प्रचंड घट आली आहे. परंतु, बियाणे, वखरणी, खते, कीटकनाशके, मळणी आदींसह मजुरांचे दर सातत्याने वाढत आहेत. त्या तुलनेत धानाला कवडीमोल हमीभाव मिळत आहे. परिणामी शेती कसणे कठीण झाले आहे. हमी भावात वाढ होणे गरजेचे आहे." - विनोद पचघरे, शेतकरी, पांजरा (बोरी)

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रPaddyभातFarmerशेतकरीfarmingशेती