कर्जमुक्तीच्या नावाखाली शेतकऱ्यांची चेष्टा
By Admin | Updated: October 29, 2015 01:09 IST2015-10-29T01:09:29+5:302015-10-29T01:09:29+5:30
शासनाने सावकारी कर्ज मुक्त केल्याची घोषणा केली आहे. परंतू अनेक अटी लादण्यात आली. एकाच तालुक्याचे शेतकरी व सावकार असावे, ...

कर्जमुक्तीच्या नावाखाली शेतकऱ्यांची चेष्टा
राजेंद्र पटले : सरसकट कर्र्जमुक्त करा
भंडारा : शासनाने सावकारी कर्ज मुक्त केल्याची घोषणा केली आहे. परंतू अनेक अटी लादण्यात आली. एकाच तालुक्याचे शेतकरी व सावकार असावे, दुसऱ्य तालुक्याचा किंवा दुसऱ्या जिल्ह्याचा सावकार नसावा जर शासनाला कर्ज मुक्ती खरचं करायची आहे तर या अटी कशाला पाहिजे, सरळरित्या शेतकऱ्यांचे सावकारी कर्ज पूर्ण मुक्त करावयास पाहिजे. मग तो महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्याचा परवानाधारक सावकार असो नियम शेतकऱ्यांवर लागू करण्यात येतो तर मग सावकाराला सुद्धा परवानामध्ये नमूद क्षेत्राच्या बाहेर कर्ज देता येत नाही. ज्या सावकाराने आपल्या क्षेत्राच्या बाहेर कर्ज दिला असेल तर त्यांच्यावर ४२० ची कलम लावण्यात यावी. नाहीतर सरसकट कर्ज मुक्त करण्याचे सुधारित आदेश शासनाने काढावे, अशी मागणी शिवसेनेचे राजेंद्र पटले यांनी केले आहे.
दुसरीकडे अनेक शेतकऱ्यांचे भुसंपादनाचे प्रकरण निधी नसल्यामुळे धुळ खात आहेत. बावनथडी प्रकल्पासारखे भंडारा व गोंदिया जिल्ह्यात अनेक प्रकल्प आहेत. शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीचे अजुनपर्यंत मिळालेले नाही. बावनथडी सिंचन प्रकल्प, गोसेखुर्द सिंचन प्रकल्प व अनेक उपसा सिंचन प्रकल्प अजुनही अर्धवट आहेत निधी दिल्याची घोषणा झाली पण प्रत्यक्षात निधी मिळाला नाही.
सातबारा कोरा ही सुद्धा घोषणा फोलच ठरली. यामुळे शेतकरी खुप चिडले आहेत. धानाचे भाव काँग्रेसच्या काळात तर कमी होतेच म्हणून भाजपाला शेतकऱ्यांनी धानाचे भाव भरपूर वाढतील या आशेने मागील राजवटील जे धानाचे भाव होते, त्यापेक्षा ही कमी भाव करण्यात आले आहेत, अशी शेतकऱ्यांची थट्टा करून भविष्यात हे शेतकरी आपल्या पायावर कुऱ्हाडी मारतील काय असा सवालही पटले यांनी केला आहे. आता सर्रास शेतकऱ्यांची थट्टाच होत आहे. शासनाने त्वरीत शेतकऱ्यांचे जाहीर केलेले पॅकेज तपासून निर्णय घ्यावे, अशी मागणी आहे. (जिल्हा प्रतिनिधी)