धानाच्या कवडीमोल भावाला शेतकरी पडतोय ‘बळी’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 04:31 IST2021-02-15T04:31:40+5:302021-02-15T04:31:40+5:30
भंडारा जिल्ह्याची ओळख ही उद्योगविरहित, सिंचनाच्या सोयींचा अभाव, रब्बी मालासाठी उपलब्ध नसलेली बाजारपेठेचा जिल्हा म्हणून आहे. मुख्य पीक खरीप ...

धानाच्या कवडीमोल भावाला शेतकरी पडतोय ‘बळी’
भंडारा जिल्ह्याची ओळख ही उद्योगविरहित, सिंचनाच्या सोयींचा अभाव, रब्बी मालासाठी उपलब्ध नसलेली बाजारपेठेचा जिल्हा म्हणून आहे. मुख्य पीक खरीप असल्याने जवळपास ९० टक्के लोक शेतीवर अवलंबनू आहेत. शेती म्हणजेच सर्वस्व असल्याने येथील शेतकर्यांचे संसाराचे गाळे हे येणार्या पिकावरच अवलंबून असते. अशातही अत्यल्प व कवडीमोल भाव यामुळे सर्व स्वप्नांना तिलांजली दिल्याशिवाय गत्यंतर नाही.
इतकेच नाही तर शासनस्तरावरून विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी नाहक कागदपत्रे व कार्यालयांच्या चकरा माराव्या लागत असल्याने सामान्यांचा जीव मेटाकुटीस आलेला आहे. जिल्ह्यात असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये धानाची आवक वाढलेली असली तरीही कोणत्याही अडत्याकडे धानांच्या भावांचे बोर्डसुद्धा नाहीत. त्यामुळे अडत्याने जे भाव सांगितले, त्याच भावात आपला माल विकण्याशिवाय गत्यंतर नसल्याने शेतकरीवर्ग अधिकच खचत आहे.