निलज येथे शेतकऱ्याचा सर्पदंशाने मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:36 IST2021-07-28T04:36:24+5:302021-07-28T04:36:24+5:30

मनराज चिंतामण गाढवे (५३) रा. लिलज बु. असे मृताचे नाव आहे. ते स्वतःच्या शेतात धुऱ्यावरील गवत काढत होते. अचानक ...

Farmer dies of snake bite at Nilaj | निलज येथे शेतकऱ्याचा सर्पदंशाने मृत्यू

निलज येथे शेतकऱ्याचा सर्पदंशाने मृत्यू

मनराज चिंतामण गाढवे (५३) रा. लिलज बु. असे मृताचे नाव आहे. ते स्वतःच्या शेतात धुऱ्यावरील गवत काढत होते. अचानक हाताला काही तरी चावल्याचे समजले. हात झटकताच तिथून साप पसार झाला. त्यांनी गावाकडे धाव घेतली. गावातील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात नेले. मात्र तेथे कुणीही उपस्थित नव्हते. त्यानंतर त्यांना करडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. तिथे औषधी देण्यात आली ; परंतु प्रकृती चिंताजनक असल्याने डॉक्टरांनी त्यांना जिल्हा रुग्णालयात हलविण्यास सांगितले. करडी वरून भंडारा येथे उपचारासाठी नेत भिलेवाडा गावाजवळ त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते साखर कारखान्यात मदतनीस पदावर ही काम करत होते. त्यांच्या मागे त्यांची पत्नी व तीन मुली असा परिवार आहे.

Web Title: Farmer dies of snake bite at Nilaj