-ही तर शेतकºयांची दिशाभूल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2017 23:33 IST2017-10-25T23:33:47+5:302017-10-25T23:33:58+5:30
जिल्ह्यात ३ आॅक्टोंबरला धान खरेदी केंद्र सुरू झाल्याचे भाजपचे लोकप्रतिनिधी सांगत आहेत. मात्र कोणत्या केंद्रावर किती क्विंटल धान खरेदी झाल्याचे न सांगता शिवसेनेने काढलेला मोर्चामुळे .....

-ही तर शेतकºयांची दिशाभूल
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : जिल्ह्यात ३ आॅक्टोंबरला धान खरेदी केंद्र सुरू झाल्याचे भाजपचे लोकप्रतिनिधी सांगत आहेत. मात्र कोणत्या केंद्रावर किती क्विंटल धान खरेदी झाल्याचे न सांगता शिवसेनेने काढलेला मोर्चामुळे शेतकºयांची दिशाभूल होत असल्याचे म्हटले असले तरी भाजपच शेतकºयांची दिशाभूल करीत असल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे.
शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजेंद्र पटले यांच्या नेतृत्वात धान खरेदी केंद्र सुरू करण्याच्या मागणीसाठी शिवसैनिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर बैलबंडी मोर्चा काढला होता.
धान खरेदी केंद्र तातडीने सुरू करा, पाऊस कमी पडल्यामुळे पडीत शेतीचे त्वरित पंचनामे करा यासह विविध मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला होता. त्यानंतर आमदार चरण वाघमारे यांनी शिवसेना शेतकºयांची दिशाभूल करीत असल्याचा आरोप केला. त्यानंतर पटले यांनी जिल्हा मार्केटिंग अधिकाºयांशी चर्चा केली असता जिल्ह्यात दोन दिवसात सर्व केंद्र सुरू होतील, पुन्हा आंदोलन करू नका, असे सांगितल्याचे पटले यांनी सांगितले.